Carrot योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळविण्यासाठी हिवाळ्यात खा ‘गाजर’

Carrot योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळविण्यासाठी हिवाळ्यात खा ‘गाजर’

Carrot : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रोज एक तरी गाजर खाल्ले पाहिजे . गाजर (carrot) एक कंदमूळ आहे. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. तसेच गाजरात व्हिटॅमिन्स,(Vitamins) मिनरल्स (Minerals) अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) आणि बिटा केरोटीन (Beta protein) असतात. रोज नियमितपणे गाजर खाल्ले पाहिजे त्यामुळे शरीरास योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. गाजरापासून गाजर हलवा केला जातो. तसेच गाजराचे अनेक फायदेही आहे. तर चला जाणून घेऊया गाजराचे फायदे.

गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, तसेच गाजर मध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) असते. आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे बीटा-कॅरोटीन (Beta protein) डोळ्यांच्या अनेक समस्या पासून बचाव करते. जसे कि मोतीबिंदू दृष्टी चांगली होण्यासाठी गाजरचे नियमितपणे सेवन केले पाहिजे . जर तुम्हाला शरीरात रक्ताची कमतरता वाटत असेल तर तुम्ही गाजर सेवन करा. गाजर शरीरातील रक्त वाढण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. तसेच गाजरामध्ये असणारे ‘व्हिटॅमिन इ’ हे जीवनसत्व रक्तवाढीचे काम करते.

 

व्हिटॅमिन ए (Vitamin A) मुळे तुमच्या शरीराचे कार्य निरोगी राहते. शरीराच्या अनेक रोगांपासून संरक्षण करते. कारण व्हिटॅमिन ए शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते. म्हणून आहारामध्ये गाजराचा नियमितपणे सेवन करा. तसेच व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराची लोहाची गरज भागवण्यात मदत करते आणि बाह्यसंक्रमणापासून शरीराचा बचाव करते.

गाजर सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. गाजर मध्ये फायबर आढळून येते. तसेच गाजर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. गाजरातील व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि बीटा कॅरोटीन देखील मधुमेह नियंत्रणात आण्यास मदत करते. गरोदर महिलांना आहारातून त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. गरोदर महिला जे अन्न खातात त्याचा त्यांच्या बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो. गाजरातील पोषकतत्त्वांमुळे या दोघांचेही आरोग्य चांगले राहते. यासाठी गरोदर महिलांच्या आहारात गाजराचा समावेश करा.

हे ही वाचा : 

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

 

Exit mobile version