spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Children Day 2022 : बालदिवसानिमित्त घरच्या घरी बनवा चॉकलेट केक, जाणून घ्या रेसिपी

बालदिवस हा आनंदाचा दिवस असतो. बालदिवसानिमित्त आई वडील आपल्या मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतात . तसेच लहान मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. मुलांना चॉकलेटच्या कोणत्याही गोष्टी द्या ते आवडीने खातात. काही लहान मुले तर चॉकलेट केक दोन्ही हातांनी अगदी हाताला तोंडाला लावून खातात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून बालदिवसानिमित्त चॉकलेट केकची रेसिपी सांगणार आहोत.

चॉकलेट केक सर्वांना आवडतो. आजकाल चॉकलेट केक घरी बनवणे खूप सोपे झाले आहे. हा केक लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. चॉकलेट केक मध्ये बरेच प्रकार असतात. कोणतेही कार्यक्रम असेल तर केक कापला जातो. जसे की वाढदिवस , साखरपुडा , लग्न , सेलिब्रेशन , असो केक कापला जातो. तर आज आम्ही तुम्हाला चॉकलेट केक कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

 

साहित्य –

मैदा – २ कप
कोको पावडर – १ कप
साखर – दीड कप
अंडी – ४
दूध – अर्धा कप
लोणी – १ कप
बेकिंग पावडर – २ चमचे.
व्हॅनीला इसेन्स – १ चमचा.

कृती –

सर्व प्रथम मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका बाउलमध्ये मिक्स करून घ्या.

साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर त्यामध्ये लोणी घालून घ्या. मिश्रण चांगले फेटून घ्या .

त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये अंडी फोडून फेटून घ्या. फेटून घेतलेली अंडी आणि साखर, लोणी एकत्र करून घ्या. हे मिश्रण परत एकदा फेटून घ्या.

मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये अंड्याचे मिश्रण मिक्सकरून घ्या. परत एकदा मिश्रण चांगले फेटून घ्या. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्या पुन्हा एकदा फेटून घ्या. मिश्रणात व्हॅनीला इसेन्स मिसळून घ्या.

बेकिंग भांड्याला लोणी लावून घ्या. त्यात थोडा मैदा घालून घ्या.

तयार केले मिश्रण एकजीव करून घ्या. आणि चांगले पसरून घ्या.

ओव्हन मध्ये २५ – ३० मिनिटे केक बेक करायला ठेवा.

हे ही वाचा :

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळेचं डंपरच्या धडकेत निधन

आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार; ॲड. वाघमारे यांचा इशारा

 

Latest Posts

Don't Miss