CHRISTMAS 2023 : घरच्या घरी ‘असा’ बनवा EGGLESS DRYFRUIT CAKE

एगलेस केकसाठी काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

CHRISTMAS 2023 : घरच्या घरी ‘असा’ बनवा EGGLESS DRYFRUIT CAKE

ख्रिसमच्या (CHRISTMAS) निमित्ताने लहान मुलांना केक (CAKE) खाण्याची इच्छा होत असते. त्यामुळे बाजारातून विकत केक घेण्यापेक्षा जर घरच्या घरी केक बनवता आला, तर तो अधिक चविष्ट बनेल आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल. एगलेस ड्रायफ्रूट केक (EGGLESS DRYFRUIT CAKE) मुलांना खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता. हा केक आठ दिवस राहू शुद्ध शकतो आणि चवीबद्दल सांगायचं झालं तर अगदी बाजारातील चवीप्रमाणे बनवलेला हा केक लहान मुलांना नक्कीच आवडेल. तर या एगलेस केकसाठी काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

साहित्य:-

मीठ (SALT)

बेकिंग पावडर (BAKING POWDER)

मैदा (Flour)

दूध (MILK)

ड्रायफ्रूट्स (DRYFRUITS)

बटर व्हॅनिला इसेन्स (BUTTER VANILLA ESSENCE)

कंडेन्स मिल्क (CONDENSED MILK)

कृती:

एक वाटी घ्यायची किंवा मोठा भांड घ्यायचे. ज्याच्यामध्ये आपण मैदा आणि मीठ मिक्स करायचा आहे. त्यात बेकिंग पावडर गाळून घ्यायची. त्याच्यामध्ये दूध आणि कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. या भांड्यात हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून फेटून घ्यायचं आहे. ते चांगलं फेटून घेतल्यानंतर अर्धा चमचा पेक्षा कमी व्हॅनिला इसेन्स टाकायचे आणि त्यानंतर बेकिंग ट्रे ला बटरने चारी बाजूने ग्रीस करायचे आहे. त्यात मिश्रण फिरवून त्यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे त्यानंतर ओव्हन १२० डिग्री सेंटीग्रेड ते १५० सेंटीग्रेड वर गरम करायचे आणि वीस मिनिटे केकला बेक होऊन द्यायचे आहे. या कृतीनंतर तुमचा स्वादिष्ट केक तयार होणार आहे. हा एगलेस केक ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना नक्की आवडेल. जर तुम्हाला इतर कोणताही फ्लेवर यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स ऐवजी स्ट्रॉबेरी इसेन्स, मँगो इसेन्सचा वापर करू  शकता. यामध्ये तुम्ही चॉकलेट चिप्स किंवा अननसाचा फ्लेवर देखील मिक्स करू शकता. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही केक फुलवण्यासाठी त्यात इनोचा वापर सुद्धा करू शकता.

हे ही वाचा:

२०२३ या वर्षात गुगलवर ‘हे’ पदार्थ सर्वाधिक झाले सर्च; जाणून घ्या सविस्तर माहिती

HAIR DRYER वापरताना ‘ही’ काळजी घ्या | Be careful while using hair dryer | HAIR CARE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version