पालकचे जास्त सेवन करताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

पालकचे जास्त सेवन करताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

पालक बहुतेक लोकांना आवडत नाही, पण पालक सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच लहान मुलांच्या वाढीसाठी पालक खूप फायदेशीर आहे. पालेभाजीचे सेवन करणे शरीरासाठी खूप उत्तम आहे. यामुळे आरोग्य सुधारते. पालकचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या रोगालाही दूर करता येते. पालकमध्ये beta carotene आणि Vitamin C असते. हे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या Cancer च्या पेशींना नष्ट करतात. पण तुम्हाला पालक खाण्याचे फायदे माहित असतील पण तुम्हाला दुष्परिणाम माहित आहे का ?

 

पालकमध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत, पालक मध्ये Calcium, magnesium, vitamin मोठया प्रमाणात आढळून येते. तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये नियमितपणे पालकचा समावेश केला तर तुमचे कर्करोगा पासुन संरक्षण होऊ शकते. रक्तातील सखारेचे प्रमाण नियंत्रित राहाते. पालकचे नियमित पणे सेवन केल्याने मधूमेह सारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते. पालक खाण्याने दृष्टी सुधारते आणि हाडांसाठी देखील फायदेशीर आहे पालक. तसेच पालकचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा देखील कमी होतो.

बहुतेक लोक पालकाचा वापर रस मध्ये देखील करतात, असे म्हटले जाते पालक सेवन केल्याने शरीरातील लोह आणि व्हिटॅमिन के कमतरता दूर करण्यास मदत करते. म्हणून पालकाचे कमी प्रमाणात सेवन करावे. पालक मध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त आढळून येते, पालक जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता असू शकते. असे सांगण्यात येते की १०० ग्रॅम पालक मध्ये ९७० मिलीग्राम ऑक्सलेट असते. जर तुम्ही पालक उकडून घेतले की पालक मधील ऑक्सलेट कमी करता येते. पालक मध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचायला जड जाते. पालकचे सेवन केल्याने शरीरावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, पालकचे जास्त सेवन केल्याने गॅसचा धोका होऊ शकतो. पालक मध्ये व्हिटॅमिन के चे प्रमाण जास्त आढळून येते. हे रक्त पातळ करण्यास मदत करते.

 

हे ही वाचा : थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

Exit mobile version