spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तीच तीच डाळ खाऊन कंटळला आहात ?मग ट्राय करा खट्टी मिठी दाल रेसिपी

डाळी रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी सुधारवण्यास मदत करतात.तुम्हाला तीच तीच डाळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा.डाळ ही अगदी सहजपणे व कमी जिन्नसांपासून बनवली जाते.

आपल्याकडे बहुतांश डाळ हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी हमखास खाल्ला जातो. डाळ भाताला सोलफूल डिनर असे देखील म्हटले जाते.बॅलन्स डाएट (balance diet)करताना नेहमी डाळीचा समावेश केला जातो.डाळी या शरीरांसाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये भरपूर फायबर (fibre)असते. डाळी रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी सुधारवण्यास मदत करतात.तुम्हाला तीच तीच डाळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा.डाळ ही अगदी सहजपणे व कमी जिन्नसांपासून बनवली जाते. चला तर मग पाहुयात डाळ बनवण्यसाठीचे साहित्य आणि कृती.

साहित्य:

तूरडाळ – अर्धी वाटी
२ चमचे तेल
१ कांदा बारीक चिरून
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ टीस्पून चिंचेचा कोळ
१ टीस्पून साखर, मिरची पावडर
७-८ कढीपत्ता,
चिरलेली कोथिंबीर (आवश्यकतेनुसार)
मीठ (आवश्यकतेनुसार)
१/२ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून मोहरी
१ चिमूटभर हिंग
मूग डाळ – अर्धी वाटी
हळद (आवश्यकतेनुसार)

कृती:

सर्वप्रथम तूर डाळ धुवून तिला १०-१५ मिनिटे पाण्यात भीजवून ठेवा.साधारणतः तूर डाळ ही १०-१५ मिनिटात भिजवून नरम होते. त्यानंतर गॅसवर एक कुकर ठेवा. गॅस ची फ्लेमही हायफ्लेम (high flame) असूद्यात कारण कूकरच्या शिट्या काढण्यासाठी हाय फ्लेम (high flame) आवश्यक असते.इतर डाळींप्रमाणे ही डाळदेखील आपण कुकर मध्ये करणार आहोत.हि डाळ बनवण्यासाठी कूकरमध्ये तूरडाळ, पाणी,हळद,मीठ ,साखर आणि चिंचेचा कोळ घाला.आणि कूकर बंद करून कूकरच्या ३ शिट्ट्या काढून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या आणि हिंग घाला.नंतर त्यात कांदा घालून तोच थोडा परतून घ्या.नंतर त्यात मसाले घाला. मसाले मिक्स केल्यानंतर त्यात तयार कूकरमधील डाळ घाला.१० मिनिटे सर्व काही एकत्र चांगले शिजवून घ्या.आता तुमची खट्टी मिठी दाल तयार आहे, वरून कोथिंबीर घालून गार्निश (garnish)करा आणि भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.हि डाळ घट्ट असल्याकारणाने तुम्ही हि चपातीसोबतेही खाऊ शकता.यासोबत साइड डिश म्हणून तुम्ही पापड, लोणचे खाऊ शकता.

 

हे ही वाचा:

Squid Game 2 चा टिझर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल… ‘या’ दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ!

राशिभविष्य,१९ जून २०२३,आज तुम्ही बरेच मजबूत असाल…

UP आणि Bihar मध्ये १०० हुन अधिक जणांचा मृत्यू, तर ४०० हुन अधिक जणांवर उपचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss