सकाळच्या नाश्त्याला बनवा १५ मिनिटात तयार होणारे धिरडे

धिरडे हा खाद्यपदार्थ बहुतांश लोकांना माहिती असेलच. हा एक महाराष्ट्रीयन नाश्त्याचा प्रकार आहे.देशातील अनेक भागात हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो

सकाळच्या नाश्त्याला बनवा १५ मिनिटात तयार होणारे धिरडे

धिरडे हा खाद्यपदार्थ बहुतांश लोकांना माहिती असेलच. हा एक महाराष्ट्रीयन नाश्त्याचा प्रकार आहे.देशातील अनेक भागात हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो. धिरडे हा एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. भारतात विविध ठिकाणी धिरडे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात.धिरडे हा पदार्थ हे मुख्यतः तांदूळ आणि डाळींपासून तयार केला जातो.चवीला रुचकर आणि शरीराला पौष्टिक असणारा हा पदार्थ घरात अगदीच सहजतेने बनतो. तसेच हा पदार्थ बनवायला जास्त वेळ लगत नाही. चला तर मग धिरड्यांसाठीचे साहित्य आणि कृती पाहुयात.

 

 

साहित्य

१. बटाटे : 4

२. गव्हाचे पीठ : 2 वाट्या

३. रवा : 4 चमचे

४. हिरवी मिर्ची : 4

५. लसून : 5 ते 6

६. आद्रक : छोटा तुकडा

७. हिंग, हळद : लहान छोटा चमचा/ चिमुटभर

८. चवीनुसार मीठ

९. कोथंबिर

कृती:

धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची साल काढून बारीक खिसून घ्या. त्यात गव्हाचे पीठ, रवा, हिरवी मिर्ची, लसून- आद्रक पेस्ट, हळद, हिंग चिमूटभर घाला. त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तुम्हाला हिरवी मिर्ची आवडत नसेल तर तुम्ही त्यात लाल तिखट घालू शकता. आता यात मिठ घालून चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण खूप पातळ किंवा घट्ट करू नका. धिरडे कुरकुरीत व्हावे यासाठी यात रव्याचा वापर करावा. तयार झालेल पिठ अर्धा तास भिजत ठेवा. जर खूपच गडबड असेल तर तुम्ही रवा पाण्यात भिजवून पिठात मिक्स करू शकता. आता पॅन गरम करून त्यात तेल किंवा बटर टाकून घ्या. आता पॅनवर धिरड्याचे पिठ टाकून त्यावर थोडी कोथंबिर टाकून हळूहळू पसरवून घ्या. दोन्ही बाजूनी हे धिरडे चांगले खरपूस करून घ्या. आता तुमचे झटपट धिरडे तयार झाले आहेत. हे तुम्ही दही किंवा चटनी सोबत खाऊ शकता.

 

हे ही वाचा:

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

Vegan food वेगन पदार्थ म्हणजे काय ? जाणून घ्या

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version