तुम्हाला राग आला? तर अजिबात ‘या’ पदार्थांचे करू नका सेवन

काही जणांचा मुळ स्वभावच इतका चिडचिडा असतो की, छोट्या छोट्या गोष्टींवरूनही त्यांना लगेच राग येतो. या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे अनेक उपाय व ऑनलाइन पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का? की असेही काही खाद्यपदार्थ असतात खाल्ल्यामुळे तुमचा राग हा अधिक पटीने वाढू शकतो.

तुम्हाला राग आला? तर अजिबात ‘या’ पदार्थांचे करू नका सेवन

आजच्या युगात सर्वच गोष्टी इतक्या पटकन होत असतात की एखाद्या वेळेस मनासारखे काही झाले नाही की संताप झाल्याची शकता असते. काही जणांचा मुळ स्वभावच इतका चिडचिडा असतो की, छोट्या छोट्या गोष्टींवरूनही त्यांना लगेच राग येतो. या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे अनेक उपाय व ऑनलाइन पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का? की असेही काही खाद्यपदार्थ असतात खाल्ल्यामुळे तुमचा राग हा अधिक पटीने वाढू शकतो. आपल्या भावना आणि आपण खात असलेले अन्न यांच्यातील संबंधांवर आजवर अनेक आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञांनी भाष्य केलेले आहे. जसे काही खाद्यपदार्थ आपला उत्साह, ऊर्जा वाढवू शकतात तसेच काही असे पदार्थ आहेत जे आपल्यातील राग, दुःख वाढवणारे हार्मोन्स सक्रिय करू शकतात. जर तुम्ही अगोदरच नकारात्मक भावना अनुभवत असाल तर त्यावेळी काही पदार्थांचे सेवन विशेष करून टाळायला हवे. तर असे कोणते खाद्यपदार्थ आहेत जे रागात असताना खाऊ नये, जाणून घेऊयात…

गोड पदार्थ –
कँडीज, चॉकलेट्स, साखरयुक्त पेये आणि मिष्टान्न सारख्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्याने चढ-उतार होऊ शकते.तसेच साखरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे अचानक मूड बदलणे आणि चिडचिडेपणा वाढणे अश्या समस्या होऊ शकतात . जास्त साखरेचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ होतो. त्यामुळे असे गोड पदार्थ शक्यतो राग आल्यावर जास्त खाऊ नये.

कार्बोहायड्रेट –
व्हाईट ब्रेड, पास्ता, कूकीज आणि पेस्ट्री यांसारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. यामुळे तुमची मनःस्थिती बदलू शकते, चिडचिडेपणा वाढू शकतो आणि तुमची भावनिक स्थिरता कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे यामुळे तुमचा रागही वाढू शकतो.

मद्यपान –
मद्यपान करणे शरीरासाठी घातक असते. काही लोक राग किंवा तणावाचा सामना करण्यासाठी अल्कोहोलकडे वळू शकतात, परंतु सामान्यतः ते टाळण्याचा सल्ला अनेक तज्ञांकडून दिला जातो. अल्कोहोलमुळे उदासीनता वाढून निर्णयक्षमता बिघडू शकते. याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि झोपेत व्यत्यय आल्याने चिडचिड वाढण्याच्या समस्या होऊ शकतात.

फास्टफूड :
आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फास्टफूड खाणे फार आवडते.परंतु हे फास्टफूड खाल्ल्याने आपल्या शरीरात फॅटचे प्रमाण अधिकवेगाने वाढू शकते.फास्टफूड खाल्ल्याने शरीरात जळजळ होऊ शकते.फास्टफूड नियमितपणे खाल्ल्याने तुमचा आळशीपणा वाढू शकतो, आळशीपणामुळे काम पुढे ढकलले गेल्याने तुमची चिडचिड होऊ शकते.

मसालेदार पदार्थ:
मसाल्याचे पदार्थ खायला जरी रुचकर असले तरी हे पदार्थांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरात जळजळ निर्माण होऊ शकते.तसेच हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पचनक्रियेला त्रास होऊ शकतो.ज्यामुळे निराशा किंवा चिडचिड होऊ शकते.

 

हे ही वाचा:

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

Beauty Tips, तुम्ही चेहऱ्यावरील Blackheads काढताय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version