Monday, September 30, 2024

Latest Posts

तुम्हाला केळ्याचा चहा कसा बनवायचा ते माहित आहे का ? त्याचे फायदेही घ्या जाणून

आपण आतापर्यंत अनेक फळे खातो जसे की सफरचंद, मोसंबी , आंबा , पेरू , डाळिंब अशी तसेच फळांचे अनेक प्रकारे देखील आपण बनवून खातो किंवा पितो. जसेकी सफरचंदाचा जूस , डाळिंबाचा जूस , किंवा आईस्क्रीम मध्ये देखील आपण फळांचे मिश्रण करून त्याचे क्स्डड तयार करतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका फळाच्या अनोख्या प्रकाराबद्दल सांगणार आहोत. तो प्रकार म्हणजे केळ्याचा चहा. तुम्हाला ऐकून आश्चर्य झालं असेल की केळ्याचा चहा कसा बनवायचा बरं? आणि नेमकं त्याचे फायदे देखील काय आहेत ? तर आम्ही तुम्हाला केळीचा चहा बनवण्याची रेसिपी आणि त्याचे फायदे देखील सांगणार आहोत.

केळी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. तसेच केळीचा चहा हे आपली पचनसंस्था, हृदयापासून निगडीत आजार आणि इम्युनिटीवर चांगला परिणाम दर्शवतात. त्याचबरोबर मधुमेह रोग्यांना केळीच्या चहाचा अत्यंत फायदा होऊ शकतो. कारण की पाण्यामध्ये गेल्यावर केळी लगेच विरघळतात. त्यामुळे मधुमेह रोगी हे केळ्याच्या चहाचं सेवन करू शकतात आणि हे त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे. केळ्याचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही केळीची साल काढून टाकू शकता किंवा सालीसकट सुद्धा बनवू शकता. यासाठी एक केळी घ्या आणि एका भांड्यात पाणी ओतून त्यात ते केळं टाका आणि उकळवून घ्या. त्यानंतर दुध किंवा चहामध्ये केळ्याचे हे पेय मिसळा . यानंतर तुमचा चहा तयार आहे. आता तुम्ही हा चहा पिऊ शकता. केळीचा चहाचे अनेक फायदे आहेत.

मधुमेह : मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी केळ्याचा चहा फायदेशीर ठरू शकतो. मधुमेह रोगी गोड खाऊ शकत नाहीत. गोड खाल्ल्याने त्यांना लगेचच त्रास होतो. म्हणूनच केळीच्या चहाच्या सेवनाने मधुमेह रोग्यांच्या उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

वजन वाढीसाठी फायदेशीर : यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्यामुळे हे वजन वाढवण्यास फायदेशीर आहे.

हे ही वाचा:

‘तो फलंदाजी करतानाही विकेट घेत होता…’ सचिनने माजी गोलंदाजाची उडवली खिल्ली

‘तो फलंदाजी करतानाही विकेट घेत होता…’ सचिनने माजी गोलंदाजाची उडवली खिल्ली

ठाकरे गटासह विरोधकांना मोठा धक्का, परभणीतील ४० सरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss