थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

Strawberries : थंडीत स्ट्रॉबेरी (Strawberries) हे फळ आवर्जून सेवन केले जाते. हिवाळयात अनेक फळ मार्केटमध्ये येतात आणि त्याच फळांबरोबर स्ट्रॉबेरी हे फळ देखील येते, स्ट्रॉबेरी हे फळ चवीला आंबट गोड असते. आणि हे फळ सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे देखील होतात, स्ट्रॉबेरी (Strawberries) हे फळ आकाराने लहान असते, आणि डिसेंबर ते मार्च महिन्या पर्यंत असते. म्हणून हिवाळयात स्ट्रॉबेरी हे फळ आवर्जून केले पाहिजे. तसेच स्ट्रॉबेरी हे फळ सर्वांचं आवडते, तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून स्ट्रॉबेरी या फळाचे फायदे सांगणार आहोत.

स्ट्रॉबेरीमध्ये calories प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते weight कमी होऊ शकते. यासोबतच हा फायबरचे प्रमाण जास्त असते.

स्ट्रॉबेरीमध्ये (Strawberries) अनेक प्रकारचे मिनरल्स (Minerals) आढळतात. आणि त्वचेचा रंग (skin color) उजळण्यासाठी मदत होते.

 

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा (Strawberries) फायदा होतो.

तसेच स्ट्रॉबेरी Strawberries त्वचेवरील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि पिंपल्स देखील कमी करते.

थंडीच्या दिवसात हाडांना बळकटी आणि मजबूती हवी असते त्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी या फळाचे सेवन करू शकता. स्ट्रॉबेरी या फळामध्ये मँगेनिज असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. म्हणून नियमितपणे स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

फळातील सुगंध, गडद लाल रंग, रसयुक्त आणि त्याच्या गोडीकरता प्रसिध्द आहे. याचा उपयोग ज्युस, आईसक्रीम, मिल्कशेक, चाॅकलेट बनवण्याकरीत आणि खाण्याकरता देखील केला जातो. तसेच थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे आहेत.

स्ट्रॉबेरी हे फळ हंगामी फळ आहे. त्याच म्हणून याचे नियमितपणे सेवन करणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी खाण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात त्याच बरोबर नुकसान देखील होतात. जर तुम्ही स्ट्रॉबेरीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. कारण स्ट्रॉबेरी मध्ये साखर असते. म्हणून कमी प्रमाणात सेवन करावे.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Exit mobile version