आंबट गोड अननस खाण्याचे फायदे माहिती आहेत का ?

आंबट गोड अननस खाण्याचे फायदे माहिती आहेत का ?

Pineapple Benefits : थंडीत अनेक प्रकारची फळे मार्केटमध्ये पाहायला मिळतात. फळे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. थंडी म्हंटल्यावर अनेक प्रकारच्या आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच अननस उन्हाळयात जास्त प्रमाणात सेवन केले जाते. पण अननस (Pineapple) हिवाळयात देखील सेवन केले जाते. अननस चवीला आंबट गोड असते. म्हणून ते सर्वांना जास्त आवडते, तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून अननस खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

 

उत्तम आणि चांगल्या आरोग्यासाठी आहारात आपण फळे सेवन केली पाहिजे. तसेच थंडीच्या दिवसात आपण बोर, सिताफळ, पेरु, चिकू, संत्री ही फळे आवडीने सेवन करतो. पण अननस (Pineapple) बहुतेक लोक कमी प्रमाणात सेवन करतात. अननस या फळाला बाहेरून काटे असतात म्हणून ते कापण्यासाठी खूप अवघड जाते. पण अननसमध्ये जास्त प्रमाणात गुणधर्म असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. म्हणून थंडीच्या दिवसात अननस हे फळ आवर्जून सेवन करा.

अननस हे फळ हिवाळा (winter season) आणि उन्हाळा (Summer) या दोन्ही ऋतूमध्ये सेवन केले जाते. अननसमध्ये अँटी- ऑक्सिडंट (Anti-oxidant) असते जे कॅन्सर सारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करते, म्हणून कॅन्सरच्या रुग्णाने अननसाचे सेवन आवर्जून करावे. तसेच या मध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. जे अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यास मदत करते. अननस मध्ये व्हिटॅमिन सी असते आणि अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) असते जे हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते. पण त्याचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. तसेच थंडीच्या दिवसात रोगप्रातिकार शक्ती कमकुवत होत जाते, रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) उपयुक्त ठरेल. आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत देखील करेल. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम (Calcium) खूप महत्वाचे असते, आणि अननस मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते जे हाडांच्या आरोग्याला मजबूत करण्यास मदत करे

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Exit mobile version