तुम्हाला संत्र्याच्या सालीचे फायदे माहित आहे का ?

तुम्हाला संत्र्याच्या सालीचे फायदे माहित आहे का ?

नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. आरोग्यासाठी संत्र्याचे खूप फायदे आहेत . सर्दीपासून संरक्षण आणि त्वचा सुंदर बनवण्यापासून संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. संत्र खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. संत्र खाल्याने वजन नियंत्रण ठेवण्यात मदत होते. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा, छाती, फुफ्फुस, तोंड, पोट इत्यादींचा कर्करोग टाळण्यास मदत होते. तसेच संत्र्यापासून अनेक पदार्थ बनवता येते. पण तुम्हाला संत्र्याच्या सालीचे (orange peel) फायदे माहित आहे का ?

संत्री खाण्याचे फायदे अनेक आहेत , त्याच बरोबर त्याचा रस पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत. बहुतेक लोक संत्री सोलून खातात आणि त्याची साल फेकून देतात. संत्र्यांमध्ये (orange) व्हिटॅमिन सी (vitamin c) आढळून येते,आणि व्हिटॅमिन सी 9vitamin c) शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. संत्र्यांसारखे त्याच्या सालीचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्याच बरोबर संत्र्याची साले त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे देखील काम करते. संत्र्याच्या सालीमध्ये फायबर , व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात स्रोत आहे, आणि ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. संत्र्याच्या सालीचा केसांन साठी देखील फायदे होता, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळून येते.

 

वजन नियंत्रणात (weight loss) राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते. संत्र्यांच्या सालीमध्ये फायबर्सचे प्रमाण नक्कीच जा्स्त आहे. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्रीचे सेवन करा.

पचनाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी संत्र्याची साले आहेत फायदेशीर. तसेच या मध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन ऍसिडिटी सारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते, पचनाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीची बारीक पावडर बनवून घेणे आणि पाण्यात मिक्स करून पिणे.

केस खूप गळत असतील किंवा तुमचे केस पातळ होत असतील तर संत्री खाणे फायदेशीर ठरू शकते. हे तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्येपासून मुक्ती देखील देऊ शकते. रोज संत्र्याचा रस प्यायल्याने केस दाट आणि रेशमी होतात.

 

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version