मुग खायला आवडत नाही? मग घरी बनवा Healthy आणि Tasty चटकदार मुगाची चाट

मूग डाळ उच्च पचनक्षमतेसह उच्च-गुणवत्तेची प्रथिने समृद्ध आहे आणि कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates), जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals), फायबर (fiber) आणि आवश्यक फॅटी ऍसिडचा (fatty acids)उत्कृष्ट स्रोत आहे. ही चाट अगदी हेल्दी असून खूप रुचकर लागते

मुग खायला आवडत नाही? मग घरी बनवा Healthy आणि Tasty चटकदार मुगाची चाट

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपैकी एक खाद्यपदार्थाची रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या खाद्यपदार्थाचे नाव आहे चाट. चाट हे अनेक प्रकारे बनवली जाते जसे बटाटा चाट, पापडी चाट पण आज आपण जी चाट बनवणार आहोत ती चाट अगदी हेल्दी असून ही मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत. मूग डाळ उच्च पचनक्षमतेसह उच्च-गुणवत्तेची प्रथिने समृद्ध आहे आणि कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates), जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals), फायबर (fiber) आणि आवश्यक फॅटी ऍसिडचा (fatty acids)उत्कृष्ट स्रोत आहे. ही चाट अगदी हेल्दी असून खूप रुचकर लागते. तसेच ही फार कमी वेळात तयार होते. काही काम करता करता टाइमपास म्हणून काही खाद्यपदार्थ खाल्ले जातात यात चाट या पदार्थाचा समावेश होतो. तुम्ही हेल्दची काळजी घेणारे फिटनेस फ्रीक (Fitness freak) असाल तर तुम्ही ही चाट जरूर करून पाहू शकता.ही मूग चाट खाऊन पोट अगदी भरलेले राहते. चला तर पाहुयात यासाठीचे साहित्य आणि कृती.

साहित्य –

मोड आलेले मूग २ मोठे चमचे (Deformed mung beans)
कांदा १ मध्यम (Onion)
टोमॅटो १ (tomato)
सिमला मिरची १ मोठा चमचा (Capsicum)
दाण्याचा कूट १ चमचा (Code of grain)
सैंधव मीठ चवीनुसार (Saindhava salt)
कोथिंबीर १ चमचा (Coriander)
चवीसाठी आमचूर पावडर/लिंबू रस (Amchur Powder/Lemon Juice)
लाल तिखट (chili powder)
मीठ (salt)
खजूर- चिंचेची गोड चटणी (Dates- sweet tamarind chutney)

कृती –

मुगाची चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग शिजवून /वाफवून घ्या. त्यानंतर एक भांडे घेऊन त्या भांडयात मूग,बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या. नंतर यात चवीसाठी सैंधव मीठ, आमचूर पावडर/लिंबू रस, तिखट, मीठ, खजूर- चिंचेची चटणी घालून सर्वमिश्रण एकत्रित करून घ्या.आता वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. तुमची चटपटीत मूगडाळीचे चाट तयार झाली आहे.

हे ही वाचा:

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

“माझी ड्रॅगन क्वीन” बॉयफ्रेंड अनिश जोगने वाढदिवशी शेअर केला, सई ताम्हणकरचा खास विडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version