spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आवळ्याचे ज्युस पिल्याने आरोग्याच्या समस्या होतील दूर

रोज आवळ्याचे सेवन केले पाहिजे. आवळ्यामध्ये सी हे व्हिटॅमिन असते आणि ते शरीरासाठी उपयुक्त असते. आवळा हे केसांसाठी तसेच त्वचेसाठी ही चांगले असते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणत औषधी गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. आवळ्याचा रस अनेक समस्यावर उपयोगी आहे. याशिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक मानले जाणारे तसेच पोषक घटक लोह, कॅल्शिम, व्हिटॅमिन आणि फायबर हे देखील ही आवळ्यांमध्ये असते. आवळा हा खरीप हंगामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यात असतो. आवळ्यापासून लोणचं आणि रस देखील बनवले जातात. आवळ्याचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत.

हे ही वाचा :कोडेप्रेमींच्या हक्काचा दिवस ‘आंतरराष्ट्रीय सुडोकू दिन’

 

काही लोक बाहेरच्या पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करतात आणि त्यामुळे त्यांना लठ्ठपणा येतो. आवळ्याचा रस नियमितपणे पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे देखील होतील .

आवळ्याचा रस तुम्ही तुमच्या त्वचेवर ही लावू शकता. आवळ्याचा रस त्वचेवर लावल्यास त्वचा कोरडी होत नाही आणि त्वचेवरील डाग जाण्यास आणि त्वचेवरील तेलकटपणा जाण्यासाठी फायदा होऊ शकतो.

 

डोळ्यांची द्रुष्टी चांगली करण्यासाठी आणि डोळ्यातील पाणी थांबण्यासाठी किंवा जळजळ थांबवण्यासाठी आणि डोळ्यातील मोतीबिंदूचा आजार होऊ नये यासाठी आवळ्याचा रसाचा उपयोग हा केला जातो.

आवळ्याचा रस रोज पिल्याने पोटातील विकार नाहीसे होतात आणि पोट साफ होते तसेच पचनक्रिया ही सुधारते.

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात आवळ्याचा रस मिक्स करून प्यावा त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.

परंतु आवळ्याचा रस जास्त प्रमाणात पिऊ नये आणि थंडीचा महिन्यात्त त्याचे सेवन करू नये. सेवन केल्यास हृदयविकारचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि श्वसनाच्या देखील समस्या वाढू शकतील. म्हूणन आवळ्याचा रसाचे कमी प्रमाणात सेवन करावे.

हे ही वाचा :

दीपिका आणि रणवीरने घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन

 

Latest Posts

Don't Miss