जेवणाची चव वाढावा, घरी बनवा लज्जतदार शाही फ्लॉवर

हा पदार्थ खायला अगदी मसालेदार लागतो. तुम्हाला फ्लॉवरची भाजी आवडत नसेल अथवा तीच तीच रेगुलर फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ही रेसिपी जरूर करून पहा.

जेवणाची चव वाढावा, घरी बनवा लज्जतदार शाही फ्लॉवर

तुम्ही अनेकदा फ्लॉवरची भाजी खाल्ली असेल,या फ्लॉवरची भजी देखील बनवले जातात. पण आज आपण या फ्लोवीपासून एक लज्जतदार अशी नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे शाही फ्लॉवर. हा पदार्थ खायला अगदी मसालेदार लागतो. तुम्हाला फ्लॉवरची भाजी आवडत नसेल अथवा तीच तीच रेगुलर फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ही रेसिपी जरूर करून पहा.शाही फ्लॉवर हा पदार्थ अनेकदा हॉटेल्समध्ये सर्व्ह केला जातो. मात्र आज हाच पदार्थ आपण घरी बनवणार आहोत. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

फ्लॉवरचे कापलेले तुकडे (flower pieces)
मटार (Peas)
रिफाइंड ऑइल (Refined oil)
कांद्याची पेस्ट (Onion paste)
टोमॅटो (Tomato)
लांब कापलेला कांदा (Onion)
फेटलेले दही (Whipped curd)
देशी तूप (ghee)
हळद पावडर (Turmeric powder)
धणेपावडर (Coriander powder)
आले व लसूण पेस्ट (Ginger and garlic paste)
काजू (nuts)
लाल मिरची पावडर (Red chilli powder)
गरम मसाला (garam masala)
कोथिंबीर (Coriander)
मीठ चवीनुसार (Salt)

कृती:

शाही फ्लॉवर बनवण्यासाठी सर्वप्रथम उकळत्या पाण्यात फ्लॉवरचे तुकडे १० मिनिटे ठेवा. त्यानंतर फ्लॉवर पाण्यातून बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर त्यात मटरही उकळून घ्या.नंतर काजू घेऊन , हे काजू २ मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा.त्यानंतर उकळलेले काजूमध्ये दही मिक्स करुन मिक्सरमध्ये याची एक पेस्ट करून घ्या. यानंतर उकळलेले फ्लॉवरचे तुकडे साजूक तूपातून नीट परतून घ्या. आता एका कढईत तेल घाला. नंतर कढईत कांदा घाला आणि चांगला परतून घ्या.कांडा नीट परतल्यानंतर त्यात आले व लसूण पेस्ट टाका. त्यानंतर त्यात काजूची पेस्ट घाला. ही काजूची पेस्ट परतल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी घाला.जेव्हा मिश्रण घट्ट होईल, तेव्हा सर्व मसाले, फ्लॉवर आणि मटर घाला.मग थोडे गरम पाणी व मीठ घालून काहीवेळ भाजी नीट शिजवून घ्या. त्यानंतर गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घाला आणि गरम गरम शाही फ्लॉवर खाण्यासाठी सर्व्ह करा.

हे ही वाचा:

Pune airport, विमानाच्या पायऱ्यांवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version