Makhana Dosa कधी ट्राय केला आहे का? नसेल तर आता नक्कीच ट्राय करा…

मखना डोसा बनवण्यासाठी मखाना, पोहे, रवा आणि दही प्रथम एकत्र करून घ्यावे. त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून किमान ३० मिनिटे भिजवून घावे.

Makhana Dosa कधी ट्राय केला आहे का? नसेल तर आता नक्कीच ट्राय करा…

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच डोसा खूप आवडतो. मसाला डोसा खाण्याचा मोह तर कोणालाच आवरत नाही. गरमागरम डोसा चटणी आणि सांबार सोबत खाण्याची बातच काही और असते. अनेकांना डोसा मस्त कुरकुरीत असला की त्यावर बटर किंवा तूप असेल तरीही चालते. परंतु तुम्ही कधी, मखाना (Makhana) या पदार्थापासून तयार झालेला डोसा खाल्ला आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा. मख्यनापासून बनवलेला डोसा चवीला प्रचंड चविष्ट असतो तसेच बनवायला सुद्धा अगदी सोपा असतो.

मखाना हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतो. जेव्हा वजन कमी (weight lose) करण्यासाठी हेल्दी स्नॅकचा विचार केला जातो तेव्हा अनेकांकडून मखना खाण्य्याचा सल्ला हमखास दिला जातो. तुम्ही मखण्यापासून अनेक पदार्थ बनवून फस्त केले असतील, परंतु तुम्हाला माहित आहे का मखान्यापासून चविष्ट डोसा देखील तयार केला जाऊ शकतो. मखाना डोसा हा एक झटपट तयार होणार पदार्थ आहे. जो तुमची भूक त्वरित भागवू शकतो. चला तर मग पाहुयात मखाना डोसा कसा तयार केला जातो.

मखना डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

मखना १ कप
रवा १ कप
पोहे १/२ कप
दही १ कप
मीठ चवीनुसार
इनो १ चमचा
पाणी १ कप

मखना डोसा तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

मखना डोसा बनवण्यासाठी मखाना, पोहे, रवा आणि दही प्रथम एकत्र करून घ्यावे. त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून किमान ३० मिनिटे भिजवून घावे. आता हे पदार्थ मिक्सर मध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. ब्लेंड करताना मिश्रणात आवश्यकते नुसार त्यात पाणी घालू शकता. नंतर एका भांड्यात पेस्ट काढून त्यात इनो मिक्स करावा . आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि डोस्या सारखे पीठ पसरवा व त्यात तूप घालून व्यवस्थित भाजून घ्या. अशाप्रकारे तयार झालेला मखाना डोसा तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे याचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

Asia Cup मध्ये सर्वात यशस्वी संघ, Team India

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version