spot_img
Saturday, September 14, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Fast Special Recipe: उपवासाच्या दिवशी तयार करा घरच्या घरी आरोग्यदायी स्मुदी…

हिंदू धर्मात अनेक उपवास आणि व्रत-वैकल्ये केली जातात. विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक देव देवतांची आराधना केली जाते. प्रत्येक जण आपल्या आपल्या संस्कृती आणि परंपरानुसार व्रत किंवा उपवास करत असतात. या उपवासाच्या दिवसांमध्ये बरेच पदार्थ खाल्ले जात नाहीत.

उदाहरणार्थ, काही जण उपवासाला कोथिंबीर, कांदा किंवा लसूण यांसारख्या गोष्टी खाणे टाळतात. त्याचप्रमाणे काही जण केवळ दूध आणि फळे इतक्याच गोष्टी खातात. त्यामुळे आज आपण उपवासाच्या दिवशी खास स्मुदी कशी तयार करायची हे पाहू. ही स्मुदी चवदार तर असतेच परंतु आरोग्यालाही तितकीच फायदेशीर असते. स्मुदी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे ते पाहू आणि त्याच बरोबर त्याची कृतीही बघू.

उपवासासाठी स्मुदी कशी बनवायची हे आपण जाणून घेऊ.
साहित्य:
भाजलेला मखाणा – १ वाटी
भाजलेले शेंगदाणे- १ चमचा
बारिक केलेले बदाम – १ चमचा
नारळाचे दूध
केळी – १
सफरचंद – १
खजुर – ३ते ४
चीया सीड्स
वेलची पावडर

उपवासाची स्मुदी बनवण्याची पद्धत:
कृती:
१) सर्व प्रथम मखाणे, शेंगदाणे, वेलची, बदाम हे पदार्थ थोडे भाजून घ्यावे.
२) त्यानंतर भाजलेले मखाणे, शेंगदाणे, वेलची, बदाम मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यावेत.
३) सफरचंद आणि केळीचे बारिक तुकडे सुद्धा बारीक करून घ्यावे.
३) मखाणे, शेंगदाणे, वेलची, बदाम, सफरचंद आणि केळीचे तुकडे बारीक झाल्यानंतर त्यात खजुरचे तुकडे आणि नारळाचे दूध टाकावे आणि सर्व पुन्हा एकदा बारीक करून घ्यावेत.
४) त्यानंतर एका ग्लास मध्ये भिजवलेले चिया सीड्स टाकून घ्यावेत.
५) चिया चीड्स टाकलेल्या ग्लासात मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण टाकावे. मग स्मुदी तयार असेल.

अश्याप्रकारे तुमची उपवसासाठी आरोग्यदायी स्मुदी पिण्यासाठी तयार असेल.

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss