पावसाळ्याच्या दिवसात खूप आळस आणि थकवा येतोय? मग ‘हे’ Energy boost food नक्की ट्राय करा

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही अनेकदा दिवसा आळस आणि थकवा जाणवतो.यामुळेच सकाळी अंथरुणातून उठण्याचीही इच्छा होत नाही.

पावसाळ्याच्या दिवसात खूप आळस आणि थकवा येतोय? मग ‘हे’ Energy boost food नक्की ट्राय करा

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही अनेकदा दिवसा आळस आणि थकवा जाणवतो.यामुळेच सकाळी अंथरुणातून उठण्याचीही इच्छा होत नाही. अनेकदा ऑफिसला जायचे असते पण ऑफिसला जाऊनही,अनेकदा ऑफिसला गेल्यानंतर काम करण्याची इच्छा होत नाही.अनेकदा या गोष्टींचा तुमच्या आहाराशी संबंध येत असतो. कारण तुम्ही रोज ज्या गोष्टी खाता ते तुमच्या शरीराच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम करत असते. ज्यामुळे शरीर दिवसभर उत्साही (Energetic) राहते.

मसाला चहा (Spice tea)

पावसाळ्यात अनेकांना चहा प्यायला फार आवडते.अनेकदा हा चहा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. या चहामध्ये लवंग, दालचिनी, वेलची आणि आले यांचा समावेश असतो. यातील पोषकतत्व आपल्याला पावसाळयातील वेगवेगळ्या आजरांपासून दूर ठेवण्यास मदत करत असतात. याशिवाय चहामध्ये आढळणारे कॅफिन तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मदत करत असते.

सूप (soup)

पावसाळ्यात अनेकदा काही तरी गरम गरम खाण्याची इच्छा होत असते. या दिवसात गरम आणि शरीराला आराम देणारे काही खाण्याची इच्छा होत असेल तर सूप हा एक उत्तम पर्याय ठरतो. वाटीभर सूप तुम्हाला आवश्यक पोषण (Nutrition) देते तसेच या व्यतिरिक्त हे शरीर मजबूत ठेवण्यासाठी मदत करू शकते.

खिचडी (Khichdi)

डाळींमध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. जर डाळ आणि तांदूळ वापरून त्याची योग्य प्रकारे खिचडी बनवली तर त्यातून तुम्हाला तुमच्या शरीराला एनर्जेटिक (Energetic) ठेवण्यासाठी उत्तम कार्ब्स (Carbs) मिळतील. खिचडी हा पदार्थ कर्बोदकांने भरलेला असून पावसाळ्यच्या दिवसात तो खायलाही फार छान लागतो. तसेच खिचडी बनवायलाही खूप सोपी आहे.

काढा किंवा हर्बल चहा (Extract or herbal tea)

काढा हा एक पौराणिक पदार्थ असून तो एक औषधाचा भाग आहे. अनेकदा आजारी व्यक्तीला काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. काढा बनवताना त्यात अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर केला जातो. काढा तुमची रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढवण्यास मदत करतो. तसेच काढा पिल्याने फ्लू (flu) या आजारापासून मुक्ती मिळते.

प्रोबायोटिक्स (Probiotics)

शरीरातील एनर्जी लेव्हलचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पचनक्रिया सुरळीत असेल तर आपला दिवस निरोगी, आनंदी राहण्यास मदत होत असते. म्हणूनच पावसाळ्यात गॅस, ऍसिडिटी (Acidity) आणि आतड्यांसंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी तुमच्या आहारात प्रोबायोटिक्सचा (Probiotics) समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.प्रोबायोटिक्सच्या (Probiotics) सेवनाने शरीरातील IgA आणि T-lymphocytes सारख्या रोगप्रतिकारक (immune system) शक्ती वाढवणाऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.

हे ही वाचा:

Kalachowki मधील Food Dudes मध्ये मिलतोय स्वादिष्ट Wefer Pav | Kurkure bhel, Melting sandwich…

सामनातून शिंदेंवर हल्लाबोल, राज्यात सत्तेसाठी गुवाहाटीत ‘रेडा’ बळी दिला, पण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version