Saturday, June 29, 2024

Latest Posts

Masale Bhat Recipe: अगदी कमी वेळेत बनणारा मसालेभात, पहा कृती…

आपल्याकडे काही नसेल तर भात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. घरात काही नसेल , तर भात हा ऑप्शनला असतो. पण कधी कधी अगदीच भूक लागली तर चटकन काहीतरी मसालेदार खाण्याची ईच्छा होते. अश्यावेळी चटपटीत अगदी कमी वेळात मसालेदार भात (Masale Bhat Recipe) कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्याकडे काही नसेल तर भात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. घरात काही नसेल, तर भात हा ऑप्शनला असतो. पण कधी कधी अगदीच भूक लागली तर चटकन काहीतरी मसालेदार खाण्याची ईच्छा होते. अश्यावेळी चटपटीत अगदी कमी वेळात मसालेदार भात (Masale Bhat Recipe) कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य;-

तांदूळ
२ ते ३ बटाटे
२ टोमॅटो
२ ते ३ कांदे
वटाणे
आलं लसूण पेस्ट
५ ते ६ लसणाच्या पाकळ्या
कोथिंबीर
कडीपत्ता
खडे मसाले

कृती :-

सर्वप्रथम बटाटे, टोमॅटो, कांदे आवडत असेल तर शिमला मिर्च आणि हिरव्या मिरची चिरून घ्यावेत. दुसरीकडे आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. मिडीयम फ्लेम वर कुकर गरम करायला ठेवावा. त्यात तूप किंवा तेल टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, हळद, खडे मसाले, लसूण व कडीपत्ता टाकावा. लसूण हलकासा शिजल्यानंतर त्यात वरून कांदा टाकावा. कांदा शक्यतो उभा चिरलेलाच घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टेकवून मिश्रण हलवून घ्या. यानंतर त्यात टोमॅटो, बटाटे, आणि वाटाणे, मिरची आणि तुमच्या आवडीच्या भाज्या काही काही अंतराने घाला.

यानंतर एका साईडला प्लेट मध्ये लाल मिरची मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, हिंग व तुमच्या आवडीचे अन्य काही मसाले तुम्ही यात ऍड करू शकता. भाज्यांमध्ये हे सगळे मसाले टाकून मिश्रण मिक्स करून घ्या. यानंतर दुसरीकडे तुम्हाला हवा तेवढा तांदूळ घेऊन व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर हा तांदूळ कुकरमध्ये टाका. तांदुळ जितक्या प्रमाणात घेतलं आहे त्याप्रमाणे पाणी त्यात टाका. मीठ टाकून एकदा हलवून घ्या. नंतर मोठ्या फ्लेमवर कुकर बंद करून ठेवा. तुम्हाला ओलसर भात हवा असेल तर ३ ते ४ शिट्ट्या काढा. अन्यथा ४ ते ५ शिट्ट्या काढा. नंतर गॅस बंद करून थोड्या वेळाने प्लेटमध्ये काढा. आणि तुमचा झटपट तयार मसाले भात तयार आहे. हा मसाले भात तुम्ही दही, रायतासोबतही खाऊ शकता.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss