रात्रीच्या जेवणासाठी बनवा बटाटा टोमॅटोची खमंग ग्रेव्ही

रात्रीच्या जेवणासाठी बनवा बटाटा टोमॅटोची खमंग ग्रेव्ही

रात्रीच्या जेवणात नक्की कुठला पदार्थ बनवायचा हा प्रश्न तुम्हाला भरपूर वेळा पडत असेल. ऑफिस मधून थकून आल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे होते त्यामुळे किचनमध्ये देखील जेवण बनवण्यासाठी कंटाळा येतो. तसेच आपण बटाट्यापासून बटाट्याची भाजी बटाट्याची पुरी बटाट्याची ग्रेव्ही टोमॅटो भाजी असे पदार्थ बनवत असतो. टोमॅटो आणि बटाटा आरोग्यासाठी देखील पौष्टिक आहेत. आजकालच्या लहान मुलांना टोमॅटो आणि बटाटा पासून कुठलाही नवीन पदार्थ बनवला तो त्यांना आवडतो. तर आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी खास बटाटा टोमॅटो पासून एका नवीन आणि वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही कशी बनवायची ते आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून सांगणार आहोत जाणून घ्या साहित्य आणि कृती.

हे ही वाचा : जर तुम्हाला थकवा घालवायचा असेल तर आवर्जून प्या हे पेय

 

बटाटा आणि टोमॅटो ग्रेव्ही बनवण्याची रेसिपी –

बटाटा आणि टोमॅटो ग्रेव्ही बनवण्याचे साहित्य –

बटाटा 3

मोठे टोमॅटो 3

आले पेस्ट

लसूण पेस्ट

जिरे

हळद

लाल मिरची पावडर

धने पावडर

आमचूर पावडर

चवीनुसार मीठ

गरम मसाला

हिंग

कोथिंबीर

तेल

 

बटाटा टोमॅटो ग्रेव्ही बनवण्याची कृती –

बटाटा उकडून त्याची साल काढून घ्यावी. बटाट्या चे तुकडे किंवा बटाटे मॅश देखील करू शकता. टोमॅटो पण कापून घ्या. आले, लसूण सोलून मिक्सरमध्ये टोमॅटो घालून पेस्ट बनवा. आता पॅन ठेवा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला. त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून ढवळून घेणे. धणे, हळद, लाल मिरची, गरम मसाला पावडर हे मसाले देखील घालणे. 5 मिनिटे मंद आचेवर तळून घ्या. कढईतून तेल सुटू लागले की त्यात बटाटे घाला. आता त्यात हिंग पावडर, आमचूर पावडर घालणे. ग्रेव्हीसाठी, त्यात पाणी घाला. ५ मिनिटे शिजवा. एका भांड्यात काढा. त्यावर कोथिंबीर घालून सजवा.

हे ही वाचा :

कडू कारल्यापासून बनवा स्वादिष्ट सीख कबाब; जाणून घ्या रेसिपी

 

Exit mobile version