Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गव्हाच्या पिठाचे मोदक ही एक स्वादिष्ट आणि पारंपारिक मराठी रेसिपी आहे. हे मोदक गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवले जातात आणि गूळ व खोबऱ्याच्या सारणाने भरलेले असतात.

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेशोत्सवामध्ये अनेक घरांमध्ये विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. त्यात तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक हे आवर्जून बनविले जातात. पण, अनेकांना उकडीचे मोदक बनवता येत नाही. अशा वेळी तुम्ही गव्हाच्या पिठापासून सोपे व झटपट मोदक नक्कीच ट्राय करू शकता. गव्हाच्या पिठाचे मोदक ही एक स्वादिष्ट आणि पारंपारिक मराठी रेसिपी आहे. हे मोदक गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवले जातात आणि गूळ व खोबऱ्याच्या सारणाने भरलेले असतात. चला तर मग गव्हाच्या पिठापासून झटपट आणि चविष्ट मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया.

साहित्य:

बाह्य आवरणासाठी:

सारणासाठी:

कृती:

आवरण कसे तयार करायचे?

एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या, त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घालून चांगले एकत्र करा.
पाणी थोडे थोडे घालत पीठ मळून घ्या. पीठ मऊ आणि चिकटसर होईल. ते बाजूला ठेवून झाकून ठेवा.

सारण कसे तयार करायचे?

एका पॅनमध्ये तूप गरम करा.
त्यात खसखस आणि काजूचे तुकडे घालून थोडेसे परतून घ्या.
नंतर त्यात किसलेले खोबरे घालून २-३ मिनिटे परता.
किंचित रंग बदलेल तेव्हा त्यात किसलेला गूळ घाला.
गूळ वितळून सारण मऊ होईल. आता त्यात वेलची पूड घाला आणि सारण पूर्णपणे शिजू द्या.
नंतर सारण गार होऊ द्या.

मोदक कसे तयार करायचे?

मळलेले पीठ छोटे छोटे गोळे बनवा.
प्रत्येक गोळा चपटा करून त्याचा छोटा पारी बनवा.
पारीच्या मध्यभागी एक चमचा सारण ठेवा.
पारीच्या कडा जुळवून मोदकाला आकार द्या.
सर्व मोदक तयार झाल्यावर, मोदक वाफवण्याच्या पात्रात ठेवा.
१०-१५ मिनिटे मोदक वाफवून घ्या.

 

Exit mobile version