spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: बाप्पासाठी खास नैवेद्य, करून पहा ‘हे’ पौष्टिक मोदक

बाप्पाला मोदक अर्पण करत असाल तर यावेळी दरवर्षी सारखे मोदक न बनवता यावेळी ड्रायफ्रूटचे मोदक करून पहा. घरात रोज वेगवेगळे पदार्थ नैवेद्याला बनवण्याची परंपरा आहे. त्यासाठीच या वेळी काही वेगळं करून पहा. म्हणूनच ड्रायफ्रूट मोदक ही पूर्णपणे वेगळी रेसिपी ठरेल.

गणेश चतुर्थीचा सण सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच नाही तर देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदक अर्पण केले जातात. तुम्हीही घरात आलेल्या बाप्पाला मोदक अर्पण करत असाल तर यावेळी दरवर्षी सारखे मोदक न बनवता यावेळी ड्रायफ्रूटचे मोदक करून पहा. घरात रोज वेगवेगळे पदार्थ नैवेद्याला बनवण्याची परंपरा आहे. त्यासाठीच या वेळी काही वेगळं करून पहा. म्हणूनच ड्रायफ्रूट मोदक ही पूर्णपणे वेगळी रेसिपी ठरेल. चला तर मग जाणून घेऊया ड्रायफ्रूटचे मोदक कसे तयार करायचे.

साहित्य:

  • १/४  कप काजू (बारीक चिरलेले)
  • १/४ कप बदाम (बारीक चिरलेले)
  • १/४ कप पिस्ते (बारीक चिरलेले)
  • १/४ कप अक्रोड (बारीक चिरलेले)
  • ८ ते १० खजूर (बारीक चिरलेले)
  • २ टेबलस्पून तूप
  • १/४ कप ओले नारळ (किसलेले, ऐच्छिक)
  • १  टीस्पून वेलची पावडर
  • २  टेबलस्पून खसखस (ऐच्छिक)
  • २  टेबलस्पून गूळ (चिरलेला किंवा किसलेला)

कृती:

  • एका कढईत तूप गरम करा.
  • त्यात बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खसखस घालून २ ते ३  मिनिटं मध्यम आचेवर परता.
  • ड्रायफ्रूट्स थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • भाजून झाल्यावर ते बाजूला ठेवा.
  • त्याच कढईत चिरलेले खजूर, ओले नारळ आणि गूळ घाला. हे मिश्रण नीट परता, जोपर्यंत गूळ वितळत नाही.
  • गूळ वितळल्यानंतर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घाला. सगळं एकत्र चांगलं मिक्स करा.
  • मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हातात थोडं तूप लावून या मिश्रणाचे लहान गोळे बनवा आणि मोदकाचा आकार द्या.
  • तयार आहेत तुमचे स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रायफ्रूट्स मोदक.
हे ही वाचा:

Akshay Kumar च्या वाढदिवसानिमित्त ‘भूत बंगला’ चित्रपटाची घोषणा…

Ganeshotsav 2024: लाडक्या गणेशाला रेड वेलवेट मोदकचा नैवेद्य…जाणून घ्या रेसिपी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss