spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: कपभर पनीर आणि झटपट रसमलाई मोदक तयार…

गणपतीचे दहा दिवस नेमका रोज नवीन कोणता प्रसाद करायचा यात घरच्या गृहिणीचा फार गोंधळ उडतो. त्यातही जर घरची गृहिणी ऑफिसला जाणारी असेल तर कामाच्या गडबडीत प्रसादाला रोज काय बनवायचे यात तर तिची तारांबळ उडते. अशावेळी घरीच असणाऱ्या मोजकेच साहित्य वापरून झटपट तयार होणारे रसमलाई मोदक तयार करू शकतो.

काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपतीची आरती झाल्यावर बापाला नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत असते. गणपतीच्या दर्शनाला पाहुणे घरी आल्यावर त्यांच्यासाठी रोज आरती झाल्यावर प्रसाद काय करावा असा घरच्या गृहिणीला प्रश्न पडतो. गणपतीचे दहा दिवस नेमका रोज नवीन कोणता प्रसाद करायचा यात घरच्या गृहिणीचा फार गोंधळ उडतो. त्यातही जर घरची गृहिणी ऑफिसला जाणारी असेल तर कामाच्या गडबडीत प्रसादाला रोज काय बनवायचे यात तर तिची तारांबळ उडते. अशावेळी घरीच असणाऱ्या मोजकेच साहित्य वापरून झटपट तयार होणारे रसमलाई मोदक तयार करू शकतो. पनीरपासून रसमलाई मोदक कसे तयार करावेत याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य:

  • २०० ग्रॅम पनीर (किसलेले)
  • १ कप मिल्क पावडर
  • १/२ कप साखर
  • १/२ कप दूध
  • १/२ टीस्पून वेलची पूड
  • १ टेबलस्पून तूप
  • २-३ केशर धागे (ऐच्छिक)
  • ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) सजावटीसाठी

कृती:

  • एका कढईत तूप गरम करा. त्यात किसलेले पनीर घाला आणि २-३ मिनिटं परता.
  • त्यात दूध घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवून घ्या.
  • आता मिल्क पावडर आणि साखर घाला. सर्व घटक चांगले मिसळून घ्या.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि कडेला सुटू लागेपर्यंत हलवत राहा.
  • शेवटी वेलची पूड आणि केशर धागे घालून मिसळा. मिश्रण आचेवरून उतरवा आणि थंड होऊ द्या.
  • थंड झालेलं मिश्रण हाताने मळून घ्या.
  • छोटे गोळे करून मोदकाचा साचा वापरून त्यांना मोदकाचा आकार द्या.
  • मोदकांना सजवण्यासाठी वर ड्रायफ्रूट्स लावा.
  • तयार पनीर आणि मिल्क पावडर मोदक १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा.

थंड करून हे स्वादिष्ट मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.

Hasan Mushrif यांना मी सिरीयसली घेत नाही, माझ्यामागे Sharad Pawar यांचा आशीर्वाद: Samarjit Ghatge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss