spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या पदार्थामध्ये समावेश करा केसर भाताचा; जाणून घ्या रेसिपी…

गणपती बापाच्या आगमनासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व गणेशभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गणपती बाप्पाची पूजा अर्चा, नैवेद्य यांसाठीची सुद्धा तयारी सुरु झाली आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी मेजवानी तयार केली जाते. या मेजवानीमध्ये आणखी भर म्हणून आज केसर भाताचा समावेश तुम्ही करू शकता. चवीला अप्रतिम असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल.

साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
२ कप साखर
१ तमालपत्र
२ लवंगा
कापलेले बदाम
कापलेले काजू
२ टीस्पून तूप
आवश्यकतेनुसार पाणी
वेलचीची पूड
केशर
गरज असल्यास खाण्याचा पिवळा रंग

कृती:
१) प्रथम एका भांड्यात बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन अर्धा तास भिजत ठेवावे. बाजूला केसर, दूध आणि खाण्याचा पिवळा रंग एकत्र करून ठेवावे.
२) गॅसवर एक कढई गरम करून घ्यावी आणि त्यात तूप घालावे.
३) मग त्यात तमालपत्र, लवंगा आणि वेलची टाकून आणि परतून घ्यावी.
४) यानंतर त्यात भिजवलेले बासमती तांदूळ आणि इतर सामग्री टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.
५) नंतर कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटे मंद आचेवर मिश्रण वाफवून घ्या.
६) यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि तांदूळ शिजण्यासाठी ठेवून द्या.
७) तांदूळ चांगला शिजला की तांदळाचे पाणी चाळणीतून गाळून थंड होण्यासाठी भांड्यात ठेवा
८) आता गॅसवर एक दुसरी कढई ठेवा आणि यात तूप टाका,तूप गरम झाले की यात काजू टाकून मंद आचेवर परतून घ्या.
९)आता त्याच कढईत शिजवलेल्या तांदळासोबत साखर आणि तयार केलेला केशराचा रंग टाका आणि मिक्स करा
१०) गॅसची आच वाढवा आणि तांदूळ मिक्स करून कोरडे करून घ्या.
११) यानंतर भातावर वरून वेलची, काजू, बदाम घाला आणि अशाप्रकारे तुमचा केसर भात होईल तयार.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss