spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: गॅसचा वापर न करता अगदी झटपट पद्धतीने बनवा ३ प्रकारचे मोदक! जाणून घ्या चवदार मोदकाची रेसिपी…

अनेक भाविकांचा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी प्रयत्न असतो. गणेशाला रोजरोज काय नेवैद्य करावा असा प्रश्न सर्वानाच पडत असेल. तसेच रोजच्या धावपळीमुळे किंवा ऑफिसमुळे काहींना अपुरा वेळ मिळतो. आज आपण कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या रेसिपि बघूया.

आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन नुकतेच मोठ्या थाटामाटात झाले आहे. आपले बाप्पा दहा दिवस आपल्या घरी विराजमान असणार आहे. घराघरात लाडक्या बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नेवैद्य केले जातात. अनेक भाविकांचा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी प्रयत्न असतो. गणेशाला रोजरोज काय नेवैद्य करावा असा प्रश्न सर्वानाच पडत असेल. तसेच रोजच्या धावपळीमुळे किंवा ऑफिसमुळे काहींना अपुरा वेळ मिळतो. आज आपण कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या रेसिपि बघूया. अगदी काही मिनिटातच तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळा, चविष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक नेवैद्य तयार करू शकता. या नैवेद्याचे वेगळेपण म्हणजे गॅसचा वापर न करता अगदी झटपट पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.

कमी वेळेमध्ये होणारे चविष्ट आणि पौष्टिक मोदक :

१. सुकामेवा आणि खजूराचे मोदक

या प्रकारचे मोदक करण्यासाठी बदाम, काजू, शेंगदाणे, पिस्ता वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा साधारण २ कप घ्या. ८ ते १० खजूर घ्या आणि पाव वाटी तूप घ्या. सगळे ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये फिरून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. खजूरसुद्धा बिया काढून फिरून घ्या. आता ड्रायफ्रुटची पावडर आणि खजूर एका भांड्यात एकत्र करा. त्यात थोडे तूप टाका आणि त्याचे मोदक करा.

२. तूप, गूळ आणि शेंगदाणे

शेंगदाणे मिक्सरमधून बारीक फिरून त्याचा कूट करून घ्या. नंतर शेंगदाण्याच्या कूटामध्ये तूप घालून ते मिश्रण एकत्र करून त्याचे छान मोदक करा. याला आणखी चवदार करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये जायफळची पावडर, वेलची पूडही टाकू शकतात.

३. सुकामेवा, गूळ आणि सुके खोबरे

सर्वात प्रथम खोबरे बारीक किसून घ्या. त्यानंतर खोबऱ्याचा किस, सुकामेवा आणि गूळ हे तिन्ही मिश्रण एकत्रित मिक्सरमधून फिरवा आणि ते एकजीव करून त्या मिश्रणाची पावडर करून घ्या. आता या मिश्रणाचे तुमच्या पद्धतीने छान मोदक बनवू शकता.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: “गौराई आली…गाईवासरांच्या पावलाने आली…” जाणून घ्या गौराई पूजनाची कथा

१३२ वर्षापूर्वी Lokmanya Tilak यांनी सर्वप्रथम गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली ‘या’ चाळीत आजही तीच परंपरा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss