spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

सध्या सगळीकडे अनेक प्रकारचे मोदक बनवायचं ट्रेंड चालू आहे. नारळाचे मोदक, काजूचे मोदक, चॉकलेट मोदक, खव्याचे मोदक आणि रसमलाई अशा अनेक प्रकारच्या मोदकांची रेसिपी बनवली जाते. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक मोदकांची रेसिपी सांगणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे बाप्पा आपल्या भेटीला येत असतात. यावर्षी ७ सप्टेंबर रोजी बाप्पा सर्वांच्या भेटीला येणार आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली असून सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. गणपतीसाठी वेगवेगळे नैवेद्य बनवण्यासाठी सगळ्यांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या दिवसात प्रत्येक घरात उकडीचे मोदक हे बनवले जातात. बापाला उकडीचे मोदक हे फार प्रिय आहेत. त्यामुळे बाप्पासाठी या दिवसांत उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखविला जातो.

सध्या सगळीकडे अनेक प्रकारचे मोदक बनवायचं ट्रेंड चालू आहे. नारळाचे मोदक, काजूचे मोदक, चॉकलेट मोदक, खव्याचे मोदक आणि रसमलाई अशा अनेक प्रकारच्या मोदकांची रेसिपी बनवली जाते. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक मोदकांची रेसिपी सांगणार आहोत. हे मोदक चवीला स्वादिष्ट तर लागतात तसेच ही झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग या गणेश चतुर्थीला काहीतरी नवीन आणि पौष्टिक मूगडाळीपासून बनवलेले मोदक रेसिपी पाहूया.

साहित्य:

  • मूग डाळ: १ कप
  • गूळ: १ कप (किसलेला)
  • तूप: २ चमचे
  • वेलची पूड: १/२ चमचा
  • खसखस: १ चमचा (भाजलेली)
  • तांदळाचे पीठ: २ कप (उकड काढण्यासाठी)

कृती:

  • सर्वात प्रथम मूग डाळ ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. मग ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  • एका कढईत तूप गरम करून त्यात मूग डाळीचे मिश्रण परतावे. त्यानंतर गूळ घालून ते पिठात मिसळून घ्यावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मग वेलची पूड आणि खसखस घालून मिश्रण थंड होऊ द्या.
  • नंतर एका कढईत तांदळाचे पीठ आणि पाणी घालून उकड काढा. त्याचे छोटे गोळे करा.
  • उकडलेल्या गोळ्यात मूग डाळीचे सारण भरून मोदकाचा आकार तयार करा.
  • हे मोदक वाफेवर शिजवा.
  • तयार झाल्यावर गरमागरम मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवा.
हे ही वाचा:

लालबागच्या राजाचा १६ कोटींचा मुकुट बनला आकर्षणाचा केंद्रबिंदू…

Devendra Fadnavis यांचा दावा बोगस, परकीय गुंतवणुकीवरून Vijay Wadettiwar यांचा फडणवीसांवर निशाणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss