spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: यंदाच्या ऋषिपंचमीला बनवा पारंपारिक मराठी रेसिपी

ऋषीची मिक्स भाजी ही एक पारंपारिक मराठी रेसिपी आहे, जी ऋषिपंचमीच्या दिवशी बनवली जाते. या भाजीमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि कंदमुळांचा वापर केला जातो.

यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला असणार आहे. गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषिपंचमी. येत्या ८ सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे. ऋषिपंचमी या दिवसाची ओळख म्हणजे या दिवशी केली जाणारी एक विशिष्ट भाजी. याला ‘ऋषीची भाजी’ असेही म्हणतात. ऋषिपंचमीच्या व्रतासाठी अळूची पाने, सुरण, भेंडी, लाल भोपळा, कोहळा, माठ अशा २१ प्रकारच्या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. पूर्वी या भाज्या शेतावरील बांधावर उगवलेल्या किंवा घरामागील परसबागेत लागवड केली जात होती. मात्र, शहरीकरणाच्या ओघात घरासमोरील अंगण नाहीसे झाल्यामुळे महिलांना २१ प्रकारच्या भाज्या गोळा करण्यासाठी दिवस अपुरे पडू लागले आहेत. ऋषीची मिक्स भाजी ही एक पारंपारिक मराठी रेसिपी आहे, जी ऋषिपंचमीच्या दिवशी बनवली जाते. या भाजीमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि कंदमुळांचा वापर केला जातो. चला तर मग पाहूयात गणेशोत्सव स्पेशल ऋषीची भाजी.

साहित्य:

पालेभाज्या:

  • अळूच्या पानांची भाजी – १  वाटी
  • माठाची भाजी – १  वाटी
  • चाकवतची भाजी – १  वाटी
  • शेपूची भाजी – १/२ वाटी
  • कोथिंबीर – १/२ वाटी
  • पालक – १/२ वाटी

कंदमुळे

  • सुरण – १/२ वाटी
  • रताळे – १/२ वाटी
  • मुळा  – १/२ वाटी

इतर साहित्य:

  • हरभरा डाळ – १/२ वाटी (भिजवून)
  • मक्याचे कणीस – १
  • गूळ – १  चमचा
  • हळद – १/२ चमचा
  • तिखट – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – १ चमचा
  • जिरे – १ चमचा
  • खोबरे (किसलेले) – २ चमचे
  • तेल – २ चमचे

कृती:

  • सर्व पालेभाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • कंदमुळे स्वच्छ धुवून सोलून छोटे तुकडे करून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा. त्यात जिरे आणि ओवा घालून फोडणी करा.
  • फोडणी झाली की त्यात सर्व चिरलेल्या पालेभाज्या आणि कंदमुळे घाला.
  • भाजी थोडी मऊ होईपर्यंत परता.
  • त्यात भिजवलेली हरभरा डाळ, हळद, तिखट, गूळ आणि मीठ घाला.
  • भाजी व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
  • भाजी शिजल्यावर त्यात किसलेले खोबरे घाला आणि चांगले मिक्स करा.
  • भाजीला काही मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
  • तयार ऋषीची मिक्स भाजी गरमागरम सर्व्ह करा.

ही भाजी तुमच्या भोजनात विशेष चव आणते आणि ती पौष्टिकसुद्धा आहे.

हे ही वाचा:

‘इमर्जन्सी’वरून गदारोळ!, मात्र कंगनावर नाही कोणताही परिणाम, ‘भारत भाग्य विधाता’ या नव्या चित्रपटाची बोल्ड शैलीत घोषणा

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss