spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: लाडक्या गणेशाला रेड वेलवेट मोदकचा नैवेद्य…जाणून घ्या रेसिपी

यंदाच्या वर्षी आपल्या लाडक्या गणेशाला खास पद्धतीने मोदक बनवायचे असतील तर रेड वेलवेट मोदक बनवू शकता. हा मोदक बनवणे खूप सोपा असून चवदार देखील आहे. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा वेगळा मोदक नक्की आवडेल.

आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. सगळीकडेच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरात रोज बाप्पाला आवडणारा नैवेद्य बनवला जातो. खास करून बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक हे आवर्जून बनवले जातात. तुम्हालाही यंदाच्या वर्षी आपल्या लाडक्या गणेशाला खास पद्धतीने मोदक बनवायचे असतील तर रेड वेलवेट मोदक बनवू शकता. हा मोदक बनवणे खूप सोपा असून चवदार देखील आहे. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा वेगळा मोदक नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया रेड वेलवेट बनवण्यासाठीची रेसिपी.

साहित्य:

  • १ पॅकेट क्रीम बिस्किट (चोको किंवा वॅनिला फ्लेवर)
  • १/२ कप खोवा (मावा)
  • १/२ कप पिठी साखर
  • २-३ थेंब रेड फूड कलर
  • 1 टेबलस्पून कोको पावडर
  • १/४ कप दूध
  • १ टेबलस्पून बदाम-काजू पावडर
  • १/२ टीस्पून वेलची पावडर

कृती:

  • सर्व क्रीम बिस्किट्स एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पूड करा.
  • तयार पावडरला एका बाऊलमध्ये ठेवा.
  • बिस्किट पावडरमध्ये कोको पावडर आणि रेड फूड कलर घाला.
  • त्यात पिठी साखर आणि बदाम-काजू पावडर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.
  • आता त्यात दूध थोडे थोडे घालत मऊ पीठ तयार करा. हे पीठ थोडावेळ बाजूला ठेवा.
  • खोवा हलक्या आचेवर थोडासा भाजून घ्या आणि त्यात वेलची पावडर मिसळा.
  • ही भरावणी मोदकाच्या आत भरण्यासाठी तयार ठेवा.
  • रेड वेल्वेट बिस्किट पिठाचे छोटे गोळे तयार करा.
  • त्यात खोव्याची भरावणी ठेवा आणि मोदकाचा आकार द्या.
  • सर्व मोदक तयार करा.
  • तयार मोदकांवर बदाम-काजू पावडर किंवा चांदीचा वर्ख लावून सजवा.
हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शाह सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी लीन

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य – CM Eknath Shinde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss