spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणेशचतुर्थीला बनवा ‘हा’ पारंपारिक गोड पदार्थ

साटोऱ्या ही महाराष्ट्रातील पारंपरिक गोड डिश आहे. साटोऱ्या गोड, मऊ आणि खमंग लागतात. हा पदार्थ खासकरून खास प्रसंगी किंवा देवासाठी नैवेद्य म्हणून बनवला जातो.

बापाच्या आगमनासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व गणेशभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गणपती बाप्पाची पूजा, नैवेद्य यासाठीची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी मेजवानी तयार केली जाते. बाप्पासाठी या दिवसांत काही खास गोडाचे पदार्थ केले जातात. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच ज्येष्ठागौरी येतात. ज्येष्ठागौरींना अनेकजण साटोऱ्यांचा नैवेद्य दाखवतात. साटोऱ्या ही महाराष्ट्रातील पारंपरिक गोड डिश आहे. साटोऱ्या गोड, मऊ आणि खमंग लागतात. हा पदार्थ खासकरून खास प्रसंगी किंवा देवासाठी नैवेद्य म्हणून बनवला जातो. पण या साटोऱ्या बनवायच्या कशा याची रेसिपी आपण जाणून घेऊया.

साटोऱ्या रेसिपी

साहित्य:

पीठासाठी:

  • १ कप गहू पीठ
  • २ टेबलस्पून रवा (सूजी)
  • १ टेबलस्पून तूप
  • मीठ चवीनुसार
  • पाणी (मळण्यासाठी)

सारणासाठी:

  • १ कप खवा (मावा)
  • १/२ कप गूळ (किसलेला)
  • १/२ टीस्पून वेलची पूड
  • २ टेबलस्पून तूप
  • २ टेबलस्पून सुकं खोबरं (किसलेलं)

कृती:

  • पीठ मळणे:
    एका भांड्यात गहू पीठ, रवा, तूप, आणि मीठ एकत्र करा.
    पाणी घालून मऊसर पीठ मळा. पीठ १५-२० मिनिटं झाकून ठेवा.
  • सारण तयार करणे:
    एका कढईत तूप गरम करा. त्यात खवा घाला आणि हलक्या आचेवर परता.
    खवा हलका गुलाबी होईपर्यंत परता.
    नंतर त्यात गूळ आणि वेलची पूड घाला. सर्व मिक्स करून गुळ वितळेपर्यंत शिजवा.
    शेवटी त्यात सुकं खोबरं घालून मिक्स करा. सारण तयार आहे. ते थंड होऊ द्या.
  • साटोऱ्या तयार करणे:
    मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्याची पातळ पुरी लाटा.
    पुरीच्या मध्यभागी सारण ठेवा आणि कडेने पुरी एकत्र करून गोळा तयार करा.
    हा गोळा पुन्हा हलक्या हाताने लाटून लहान साटोऱ्या तयार करा.
    तव्यावर हलके तूप घालून साटोऱ्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी होईपर्यंत शेकून घ्या. साटोऱ्या गरम किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा:

 

 

Latest Posts

Don't Miss