spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav2024: यंदाच्या गणेशोत्सवाला बाप्पाला दाखवा काजूच्या मोदकचा नैवेद्य…

उकडीचे मोदक बनवणे नक्कीच थोडे कठीण असते पण जर तुम्हाला उकडीच्या मोदकांना जर पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही काजू मोदक रेसिपी नक्की ट्राय करू शकता.

गणेश चतुर्थीचा सण ७ सप्टेंबरपासून सुरु झाला असून तो १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. हे दहा दिवस लोक बाप्पाच्या भक्तीत तल्लीन असतात. बाप्पाची दहा दिवस विधिपूर्वक पूजा केली जाते आणि त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा विचार केला तर मोदकाचे नाव पहिले येते. जर तुमच्याही घरी बाप्पा विराजमान झाले असतील तर तुम्हीही त्यांना त्यांचा आवडता मोदकाचा नैवेद्य द्यावा. उकडीचे मोदक बनवणे नक्कीच थोडे कठीण असते पण जर तुम्हाला उकडीच्या मोदकांना जर पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही काजू मोदक रेसिपी नक्की ट्राय करू शकता. काजू मोदक हे अतिशय स्वादिष्ट आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहेत, विशेषतः गणपती उत्सवाच्या वेळी बनवले जातात. काजू मोदक हे साधे, कमी साहित्याने तयार होणारे आणि चविष्ट असतात. त्यांची बनवण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे.

साहित्य:

  • काजू पावडर – १ कप (बारीक पावडर करून घ्या)
  • साखर – १/२ कप
  • पाणी – १/४ कप
  • वेलची पूड – १/४ चमचा
  • तूप – १ चमचा (साच्यात लावण्यासाठी)

काजू पावडर कशी तयार करायची:

  • काजू एका पातेल्यात मंद आचेवर थोडं गरम करून घ्या. त्यांचं जास्त तेल सुटू नये म्हणून काळजी घ्या.
  • काजू थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर तयार करा. जास्त वेळ वाटू नका, अन्यथा काजूचं तेल सुटून पेस्ट होईल.

कृती:

  • एका पातेल्यात साखर आणि पाणी मिक्स करून मध्यम आचेवर उकळवा. पाक तयार होण्यासाठी साखरेचं पूर्ण विरघळणं गरजेचं आहे. पाक साधारण एकतारी असावा. एकतारी म्हणजे पाकाचे एक तार काढता येईल इतपत घट्ट असावे.
  •  पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात तयार केलेली काजू पावडर घालून लगेच चांगलं मिक्स करा.
  • आता या मिश्रणात वेलची पूड घाला आणि मिश्रण घट्ट होऊ लागेपर्यंत परत चालू ठेवा.
  • मिश्रण थोडं मळण्याजोगं झालं की ते एका ताटात काढा आणि थोडंसं गार होऊ द्या. मात्र पूर्ण गार होण्याआधीच हे मिश्रण मळून घ्या.
  • आता तूप लावलेले मोदक साचा घ्या. काजूच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साच्यात घाला आणि हलकं दाबून मोदकाचा आकार द्या.
  • साचे हलक्या हाताने उघडा आणि मोदक बाहेर काढा. तयार काजू मोदक पूर्ण थंड होऊ द्या.

टीप:

  • काजू पावडर करताना काळजी घ्या की ती बारीक आणि गुळगुळीत असावी. मोठे तुकडे राहिल्यास मोदक चांगले तयार होणार नाहीत.
  • मिश्रण जास्त गार होण्याआधी मोदक तयार करा, कारण मिश्रण गार झालं की ते साच्यात चांगलं बसत नाही.
  • तुम्ही आवडीनुसार मोदकांमध्ये केशर किंवा ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता.
हे ही वाचा:

Lalbaugcha Raja चरणी ‘राजा राणी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण, १८ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात

महाराष्ट्राची Vidhansabha Election लवकरच…मतदार यादीत आपलं नाव कसे शोधायचे? जाणून घ्या सविस्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss