चमचमीत चिकन रोल’ रेसिपी घ्या जाणुन

चमचमीत चिकन रोल’ रेसिपी घ्या जाणुन

चिकन हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. चिकनपासून पण चिकन रोल, चिकन फ्राय, लॉलीपॉप, असे पदार्थ देखील बनवू शकतो, पण चिकन जास्त प्रमाणत काही नये. नाहीतर गंभीर आजार होण्याचा धोका असू शकतो. तर आज आपण चिकन रोल कसे बनवायचे घरच्या घेरी ते आज आम्ही दाखवणार आहोत.

हे ही वाचा : रात्रीच्या जेवणासाठी बनवा बटाटा टोमॅटोची खमंग ग्रेव्ही

 

साहित्य –

१ कप छोटे तुकडे चिकन
१/२ कप दही
१ टेबलस्पून तिखट
१/२ टेबलस्पून तंदूर मसाला-ऐच्छिक
१ टीस्पून हळद
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून चाट मसाला
१ मोठा कांदा
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल
२ टेबलस्पून बटर

 

कृती –

एका भांड्यात दही घ्यावे व त्यात सर्व मसाले टाकून एकजीव करावे.

त्यात चिकन तुकडे टाकावे. ५-१० मिक्स करुन ठेवावे.

कणीक मळून घ्यावे.

कणिक मळून झाल्यानंतर त्याच्या पोळ्या लाटून-भाजून घेणे.

पॅनमध्ये तेल टाकून चिकन फ्राय करुन घेणे.

चिकन सोबतच कांदा चांगला फ्राय करून घेणे.

भाजलेल्या पोळीवर टोमॅटो सॉस लावून चिकन व कांदा ठेवावा. वरुन चाट मसाला घालावा.

मग पोळी गरम तव्याला बटर लावून रोल करुन थोडी भाजून घ्यावी.

हे ही वाचा :

घरच्या घरी बनवा चमचमीत आणि ओली भेळ

 

Exit mobile version