खमंग चिकन कटलेट सँडविचची रेसिपी घ्या जाणून…

खमंग चिकन कटलेट सँडविचची रेसिपी घ्या जाणून…

चिकन खायाला सर्वांना आवडते. चिकनपासून आपण खूप पदार्थ बनवू शकतो. जसे की चिकन फ्राय, चिकन तंदुरी असे पदार्थ घरच्या घरी बनवू शकतो. तसेच चिकन खायाला खूप चविष्ट असते. चिकन जास्त प्रमाणात पाहू नये. जास्त प्रमाणात खाल्याने तुम्ही आजारांना निमंत्रण देत आहे. तर आज आम्ही तुम्हाला चिकनपासून चिकन कटलेट सँडविच कसे बनवायचे ते सांगणार आहोत. चिकन कटलेट सँडविच पटकन बनवता येते. तुम्हाला कधी भूक लागली तर तुम्ही १५ मिनटांत चिकन सँडविच बनवू शकता. तसेच चिकनचे नाव काढल्यास अनेकांच्या जिभेला पाणी सुटे. तुम्ही सँडविच चे खूप प्रकार बघितले असतील तर जसे की ग्रील्ड चीज सँडविच, एग सँडविच ते पनीर सँडविच, चिकन सँडविच इत्यादी, तर आज आज चिकन कटलेट सँडविच हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.

हे ही वाचा : कशी तयार करायची केळीची कचोरी ? जाणून घ्या रेसिपी…

 

रेसिपी –

चिकन
दही
तिखट
कांदा
काकडी
लिंबाचा रस
मीठ
ब्रेड
अंडी

 

कृती –

सर्व प्रथम चिकन चांगले एका भांडयात मॅरीनेट करून घ्या. मॅरीनेटसाठी चिकनमध्ये दही, तिखट आणि मीठ घाला. चांगले मिसळा, झाकून ठेवा आणि २ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तळण्याआधी चिकन १५ मिनिटे रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढून ठेवा. त्यानंतर चिकन मॅरीनेट होईपर्यंत एका भांड्यात कांदा, काकडी, लिंबाचा रस आणि मीठ घालणे. आणि मिश्रण मिक्सकरून बाजूला ठेवणे. त्यानंतर एका भांड्यात ब्रेड क्रबिंग घेणे आणि त्यात अंडी फोडून घालणे आणि चवीनुसार मीठ घालणे. त्यानंतर एका पॅन मध्ये चिकन चिकन फ्राय करून घेणे आणि अंड्याचा पोळा तयार करून घेणे. सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर एका प्लेट मध्ये ब्रेड घेणे आणि त्या ब्रेड मध्ये काकडी , कांदयाचे तयार केले मिश्रण ठेवणे त्यावर अंड्याचा पोळा आणि चिकन ठेवणे. अशाप्रकारे चिकन कटलेट सँडविच तयार आहे.

हे ही वाचा :

जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे…

 

Exit mobile version