थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीच्या गार वातावरणात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. थंडीमध्ये मुलांच्या आरोग्यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे. हिवाळयात सर्दी, खोकला, प्लु, डेंग्यू, असे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष नाही दिले तर अनेक समस्या उद्भवू शकतात. हिवाळयात लहान मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

 

लहान मुलांना हिवाळ्यात योग्य आहार द्यावा. हिवाळयात लहान मुलांच्या आरोग्यावर आवर्जून लक्ष देणे. ज्यामुळे त्यांची शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल. त्यामुळे ते अनेक आजारपासून ते दूर राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना हिवाळयात कोणते पदार्थ देण्यात येतील. लहान मुलांना हिवाळयात त्यांना पचेल असा आहार द्यावा.

हिवाळयात लहान मुलांना गूळ सेवन करायला द्यावे. लहान मुलांवर थंडीचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गुळाचा प्रभाव उष्ण असतो. गुळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता राहते. गूळ मुळे शरीरातील अनेक इन्फेक्शन पासून सुटका मिळू शकते. लहान मुलांना सर्दी, खोकला झाला तर गूळ सोबत आल्याचे सेवन करावे. त्यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

हिवाळयात थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीमध्ये लहान मुलांना अंडी खायाला द्यावे. अंड्यातील पिवळया बलकामध्ये व्हिटॅमिन “d’ असते. अंड्यामध्ये पोषक, व्हिटॅमिन, ओमेगा, ऍसिड, मिनरल्स अशी पोषक घटक असतात. थंडीच्या काळात शरीरातील तापमान कमी असते. अंडीचे सेवन केल्याने शरीरातील तापमान वाढण्यास मदत होते. म्हणून हिवाळयात लहान मुलांना अंडी द्यावी.

 

हिवाळयात मुलांना तूप द्यावे ते शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मुलांना तूप दिल्यास शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल. त्याच बरोबर डोळयांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तूप खूप फायदेशीर आहे.

हिरव्या पालेभाज्या द्यावे. आठवड्यातून एकदातरी मुलांना हिरव्या पालेभाज्या द्यावे. जसे की पालक, मेथी, अशी हिरवी पालेभाजी तुम्ही देऊ शकता. त्या सोबत तुम्ही पालक भाजी, पालक भजी, पालक पनीर, असे पदार्थ तुम्ही देऊ शकता.

हे ही वाचा :  

Black Tea : ब्लॅक टी पिणे का आहे महत्वाचे ?

 

 

Exit mobile version