Green Apple ‘व्हिटॅमिन सी’ उपयुक्त असणाऱ्या हिरव्या सफरचंदाचे फायदे

Green Apple ‘व्हिटॅमिन सी’ उपयुक्त असणाऱ्या हिरव्या सफरचंदाचे फायदे

सकाळी एक सफरचंद ( Apple ) खाल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात. रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सफरचंदाचे सेवन हे फळांमध्ये सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. फळामध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) आणि रोगांशी लढणारे घटक असतात. म्हणून नियमितपणे सफरचंद (Apple) सेवन करणे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हिरव्या सफरचंदाचे फायदे सांगणार आहोत.

हिरव्या सफरचंदामध्ये (Green Apple) जास्त प्रमाणात फायबर असते, जे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सफरचंद खाताना सफरचंदाची साल फेकू नका. कारण सफरचंदाच्या सालीचे सेवन केल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात. सफरचंद डिटॉक्सिफिकेशन (Detoxification) प्रक्रियेत मदत करते आणि तुमचे यकृतचे आरोग्य (Liver health) देखील निरोगी राहते.

 

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम (Calcium) खूप महत्वाचे असते. स्त्रियांमध्ये हाडे कमकुवत होण्याची शक्यता जास्त आढळून येते. आजकाल हाडांची समस्या ही तरुण पिढीमध्ये देखील दिसून येते. त्यासाठी हिरव्या सफरचंदाचे सेवन करणे, कारण हिरव्या सफरचंदामध्ये (Green Apple) कॅल्शियम (Calcium) भरपूर प्रमाणात आढळून येते.

हिरव्या सफरचंदांमध्ये (Green Apple) व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) यांचा समावेश असतो. सफरचंदांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी (Vitamin C) जे शरीरातील पेशींना मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेचा कर्करोग (Skin cancer) होण्याची शक्यता कमी असते.तसेच हिरव्या सफरचंदांमध्ये (Green Apple) व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील असते जे चांगली दृष्टी (vision) ठेवण्यास मदत करते. तसेच तुम्ही सफरचंदापासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता.

त्वचेला तुम्ही हिरव्या सफरचंदाचा रस (Green Apple Juice) देखील लावू शकता, त्वचेला रस लावल्याने त्वचा पोषण (Nutrition) आणि मॉइश्चरायझिंग (Moisturizing) होऊ शकते. तसेच तुम्ही सफरचंदा पासून फेस पॅक (Face pack) देखील बनवू शकता. आणि नियमितपणे सफरचंद खा.

हे ही वाचा : 

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

Exit mobile version