Green Momos तुम्हाला ग्रीन मोमो ही रेसिपी माहित आहे का ?

Green Momos  तुम्हाला ग्रीन मोमो ही रेसिपी माहित आहे का ?

Green Momos : सध्या फास्ट फूड खाण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. प्रत्येक गल्लीत फास्ट फूडचे स्टॉल आणि दुकाने दिसतात. संध्याकाळी जास्त प्रमाणात भूक लागते. आणि ती भूक कमी करण्यासाठी आपण फूडच्या स्टॉला जातो. आजकालची तरुण पिढी मोमोजची दिवाणी झाली आहे. मोमोजमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, जसे स्टीम मोमो, तंदुरी मोमो असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. तुम्हाला जर घरी मोमोज बनवायचे असतील तर ही ग्रीन मोमोज रेसिपी नक्की घरी ट्राय करून पाहा तुम्हाला खूप आवडेल.

साहित्य :

२ वाट्या मैदा

१ वाटी पालक

१ वाटी किसलेलं गाजर

१ वाटी किसलेलं बीट

१ वाटी बारीक चिरलेला कोबी

१ वाटी किसलेलं पनीर

२ चिरलेल्या बारीक मिरच्या

१ चमचा किसलेलं आलं

२ चमचे मिरीपूड

२ चमचे सोया सॉस

चवीनुसार मीठ

 

तेल

कृती :

सर्वप्रथम पालक चांगली स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सर मध्ये चांगली बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका बाउल मध्ये मैदा घ्या. त्यामध्ये एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, बारीक पेस्ट केलेली पालक, पाणी घालून मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर त्याचे कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर एका कपड्यात झाकून ठेवा. मोमोज साठी स्टफिंग तयार करण्यासाठी कढई मध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये आले आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेणे.

नंतर त्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्या, भाज्या चांगल्या परतवून घेणे, त्यामध्ये मिरीपूड, सोया सॉस मीठ घालून घ्या आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्या, हे मिश्रण चांगले शिजवून घ्या, नंतर पनीर बारीक चिरून घ्या. आणि मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या. नंतर कणिक पासून बारीक गोळे तयार करून घ्या. नंतर त्या तयार झालेल्या गोळे पासून पुऱ्या लाटून घ्या आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घ्या, स्टफिंग भरून झाल्यानंतर त्याला मोमोज सारखा आकार द्या आणि वाफेवर शिजवून घ्या, अशा प्रकारे ग्रीन मोमोज (Green Momos) तयार आहे.

हे ही वाचा : 

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

 

 

Exit mobile version