करा चहा सोबत दिवाळीचे फराळाचे सेवन

करा चहा सोबत दिवाळीचे फराळाचे सेवन

सकाळच्या नाश्त्यासाठी कोणते पदार्थ बनवावे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत दिवाळीचे फराळ खाऊ शकता. तसेच दिवाळी हा सण म्हटले की वेगवेगळया प्रकारचे फराळ करतो. काही वेळा असे होते की दिवाळी फराळ असेच घरात पडून असते. त्याचा उपयोग होत नाही. तर तुम्ही त्याचा उपयोग सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा चहा सोबत करू शकता. तसेच काही जणांना दिवाळीचे फराळ इतके आवडते की ते असेच खाऊन संपवून टाकतात. तसेच आता थंडी सुरु झाली जास्त प्रमाणात भूक लागते. कधी कधी आपण भुकेच्या नादात बाहेरचे पदार्थ सेवन करतो. अश्यावेळी बाहेरचे पदार्थ सेवन न करता दिवाळीच्या फराळाचे सेवन करावे. तसेच ते आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते.

हे ही वाचा:  Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीला घर सजवा ‘या’ खास दिव्यांनी

 

शंकरपाळी म्हटली की मैद्याची किंवा रव्याची केली जाते. गोडी शंकरपाळी तोंडात टाकल्यावर काही प्रमाणात विरघळते. नाहीतर ती कडक राहते. नाहीतर त्याचे प्रमाण कमी, जास्त झाले तर मात्र ही शंकरपाळी काही केल्या संपत नाहीत. पण ही शंकरपाळी दुधामध्ये बुडवून खाल्ल्यास खूप चवीष्ट लागते किंवा तुम्ही शंकरपाळी चहा सोबत देखील खाऊ शकता. चहा सोबत खाल्याने शंकरपाळीची चव थोडी वेगळी लागते.

चकली हि खुसखुशीत झाली की ती लगेच संपते. पण चकली थोडी कडक किंवा वातट झाली ती संपत नाही लवकर. चकली ही भाजणीच्या पिठापासून किंवा तांदळाच्या पिठापासून बनवली जाते. चकली बनवताना पिठाचे प्रमाण जास्त झाले की ती कडक होते. आणि आपण ती खाण्यास टाळतो. अशावेळी चकली दह्यासोबत खावी. किंवा तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता. त्यामुळे चकली खूप चविष्ट लागते.

चिवड्यामध्ये जास्त प्रमाणात वेगेवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पोहे, मक्याचा , पातळ पोहे असा प्रकारचा चिवडा पाहायला मिळतो. तसेच विविध प्रकारच्या पोह्यांचा चिवडा केला जातो. चिवडाही खायाला बारा नाही वाटला तर आपण तो खाणे टाळतो. मात्र चिवड्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू आणि शेव घालून खाल्ल्यास पोटभरीचेही होते आणि चविष्टही लागते.

 

हे ही वाचा:  

शिंदे गटात वाद :आमदाराने साधला आपल्याच मंत्र्यावर निशाणा

 

Exit mobile version