spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

दहीटोस्टची एकदा चव चाखल्यानंतर ही चव आपण फार काळ विसरू शकत नाही. ब्रेड टोस्ट चवीला अगदी छान लागतो.

ब्रेड हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ब्रेड आवडीने खातात. ब्रेड हा खाद्यपदार्थ आपण नाश्ता करताना तसेच जेवण करताना खातो. ब्रेड पासून अनेक स्पेशल आणि चविष्ट पदार्थ देखील बनवले जातात. सँडविच, गार्लिक ब्रेड या ब्रेड पासून बनवल्या जाणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये असणात्या पदार्थांमधील तरुणाई मधला आवडता पदार्थ आहे. परंतु तुम्ही ब्रेड पासूनच बनवलेला दही टोस्ट कधी खाल्ला आहे का? दहि टोस्ट हा खाद्यपदार्थ अगदी चविष्ट असतो. तसेच हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त मेहनत सुद्धा लागत नाही.

दहीटोस्टची एकदा चव चाखल्यानंतर ही चव आपण फार काळ विसरू शकत नाही. ब्रेड टोस्ट चवीला अगदी छान लागतो. ब्रेडटोस्ट खाऊन प्रत्येकाचेच मन तृप्त होते. ही दही टोस्टची रेसिपी तयार करणे फार सोपे आहे आणि काही मिनिटांमध्ये तयार केली जाते. ज्यांना स्वयंपाक येत नाही ते सुद्धा चमचमीत दही टोस्ट बनवू शकतात. तर चला मग जाणून घेऊयात काही मिनिटातच होणार आणि चावीला अगदी उत्तम असणारा दही टोस्ट कसा तयार केला जातो.

साहित्य –

ब्रेड ३-४ स्लाईस
बेसन २ चमचे
दही १/२ कप
कांदा १/२ चिरलेला
मिरची पावडर १/४ छोटा चमचा
हळद पावडर एक चिमूटभर
तूप २ स्पून
मोहरी २ स्पून
१०-१२ कढीपत्ता
२ हिरव्या मिरच्या मधोमध कापून
२ चमचे पाणी
चवीनुसार मीठ आणि काळी मिरी

कृती –

सर्वप्रथम दही टोस्ट बनवण्यासाठी पीठ तयार करावे. यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात तिखट, हळद, मीठ आणि काळी मिरी घालून चांगले मिसळावे. आता त्यात बेसन घालून थोडे पाणी घालून पीठ बनवून घावे. त्यात गुठळ्या दिसू नयेत हे लक्षात ठेवा. नंतर ब्रेडचे तुकडे पिठात बुडवून चांगले घोळून घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ब्रेडचे तुकडे तुमच्या आवडत्या आकारात कापून वापरू शकता.आता कढईत किंवा तव्यावर थोडे तेल गरम करून त्यावर पिठात लेपित ब्रेड स्लाइस ठेवावे व दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजावे. यानंतर फोडणी बनवण्यासाठी एका छोट्या कढईत थोडे तेल गरम करावे. नंतर या तेलात मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका आणि थोडी तडतडू द्यावे. नंतर तयार टोस्ट वर ठेवा. चिरलेल्या कांद्याने गरमागरम टोस्ट सजवून घावा. अशाप्रकारे खमंग आणि टेस्टी दहीटोस्ट तयार आहे.

हे ही वाचा:

Nyrraa Banerji ला शूटींग दरम्यान दुखापत!

कर्नाटक मधील स्त्रियांसाठी खुशखबर, सिद्धरामय्या सरकारने केले वचन पूर्ण!

मला केंद्रातल्या राजकारणात रस नाही – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss