spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खजूर खाल्याने आरोग्याच्या तक्रारी राहतील दूर…

रोज खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खजूरमध्ये दोन प्रकार असतात. एक ओले खजूर आणि दुसरे सुके खजूर. आयुर्वेदात खजूर खाण्याचे खूप फायदे सांगितले जातात. निरोगी जीवनशैलीसाठी खजूर रोज खाले पाहिजे. खजुराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी भरपूर आढळतात. रोज सकाळी सकाळी खजुराचे सेवन केले पाहिजे. खजूर खाल्याने पचनक्रिया सुधारते. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी खजूर फायदेशीर आहे. जाणून घेऊया खजूर खाण्याचे फायदे.

हे ही वाचा : पिझ्झा बनवण्याची नवीन पद्धत… घ्या जाणून

 

खजुराचे गुणधर्म –

खजुराचा रस (गोड)
गुण (उपयुक्त) आणि पचनास जड
पचन झाल्यानंतर (स्वाद) गोड
शरीरातील ताकद वाढवून वात आणि पित्तदोष कमी करते.

 

आरोग्यासाठी उपयुक्त असणारे खजूर –

रोज नियमितपणे खजूर खाल्याने पचनक्रिया सुधारते.
हृदयाच्या विकारासाठी खजूर हा उत्तम उपाय आहे.
खजूर खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
खजूरमुळे हाडाचे आरोग्य सुधारते.
दातांच्या आरोग्यासाठी रोज नियमितपणे खजूर खाणे.
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
थकवा दूर करण्यासाठी तुम्ही खजूरचा वापर करू शकता.
मूळव्याधीसाठी खजूर प्रतिबंधक आहे.
शरीरावरील जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही खजूर खाऊ शकता.
खजूर मुळे रातांधळेपणा दूर होतो. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खजूर खाणे.
त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी खजूर खूप उपयुक्त आहे.

 

खजूराचे सेवन कसे करणे –

रोज २ तरी खजूर खाणे. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही खजूर जास्त खाऊ शकता.
सकाळी रिकाम्या पोटी खजुराचे सेवन करणे , जर तुम्हाला मधेच खजूर खाऊशी वाटले तर तुम्ही खाऊ शकता.
वजन वाढीसाठी डाएट करत असाल तर रात्री झोपताना तुम्ही खजूर सोबत तुपाचे सेवन करू शकता.
खजूर भिजवून खावेत, त्यामुळे पचनासाठी खजूर उपयुक्त असते आणि खजूरमधील ऍसिड निगुन जाण्यास मदत होते.
खजूर रात्री झोपताना म्हणजे ८ ते १० तासांसाठी भिजवल्यास ते पचायला हलके होतात.
लहान मुलांमध्ये तब्येत सुधारण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर खाणे फायद्याचे ठरते. ज्यांचे वजन कमी आहे, प्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांना आवर्जून खजूर द्यायला हवेत.

हे ही वाचा :

इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर या टिप्स करा फॉलो

 

Latest Posts

Don't Miss