spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Health Tips : मनुक्यांचं पाणी प्या अन् आजारापासून रहा दूर

मनुक्यांचे आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. आपण अनेक खाद्या पदार्थांमध्येही ते आवर्जून घालतो. पण आता फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी मनुका खाव्या. म्हणून त्याचा उत्तम फायदा मिळण्याच्या दृष्टीकोनातून कशा पध्दतीने मनूका खाव्यात ते सांगत आहोत. मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

मनुक्यांचे पाणी आपले रक्त स्वच्छ करण्याचे काम करते आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

मनुक्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातून सर्व हानिकारक विष बाहेर काढण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करण्यात मदत करते. हे आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील आम्ल नियंत्रित करते.

मनुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्निशियम असते. रोज याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी तंदुरूस्त राहते.

मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

आजच्या काळात इम्युनिटी मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायलं तर माणूस आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकतो. यात व्हिटॅमिन सी आणि प्रथिने आढळतात. या घटकांचा तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप उपयोग होतो.

केस मजबूत करण्यासाठी मुनक्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. यासाठी सकाळी उठून रिकाम्या पोटी मुनक्याचे पाणी प्या. असे केल्याने केसगळतीची समस्या तर दूर होतेच पण केसांची वाढही होऊ शकते.

मनुक्यांचे पाणी कसे तयार करावे?

मनुक्यांचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला पाणी, मनुका आणि लिंबू लागेल. दोन कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुका घ्यावेत. एका पातेल्यात पाणी उकळावे. त्यात मनुके घालून रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून मंद आचेवर गरम करा आणि रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला या पाण्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही पाण्यात लिंबू घालू शकता.

हे ही वाचा : 

महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम पवारसाहेबांनी केले – अजित पवार

उद्धव ठाकरे शरद पवरांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल

चंद्रकांत पाटलांचा मोठा निर्णय, कारवाया मागे घेण्याच्या दिल्या सूचना

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss