अशा प्रकारे बनवा घरच्या घरी कॅलशियमयुक्त हेल्दी लाडू

अशा प्रकारे बनवा घरच्या घरी कॅलशियमयुक्त हेल्दी लाडू

आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा असणारा आणि अविभाज्य घटक म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि त्याचबरोबर बळकट ठेवण्याचे काम मदत करतो. शरीरातील कॅल्शियममुळे आपण आपल्या जीवनातील वेगवेगळी कामं सहजरीत्या करू शकतो. जर आपल्या शरीरात कॅल्शियम नसेल तर आपण कोणतेही काम नीट करू शकणार नाही. त्याचबरोबर दिवसभर थकवा जाणवेल. तसेच आपल्याला हाडे दु:खी, सांधेदुखी अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. महिलांमध्ये कॅल्शिमचे प्रमाण कमी असते. केस गळणे, नखे तुटणे किंवा त्यांची चांगली वाढ न होणे, पाठ- कंबर आणि इतर जॉईंट्समध्ये वेदना असणे, ही सगळी कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. कॅल्शिमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण भरपूर औषधोपचार करतो. तरीही कॅल्शियमची समस्या कमी होत नाही. अनेक लोकांच्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. कॅल्शिम वाढवण्यासाठी शरीरात ड जीवनसत्वाची गरज असते. म्हणून आम्ही आज तुम्हाला घरच्या घरी कॅल्शियमयुक्त हेल्दी लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

हे ही वाचा: उपवासाठी चविष्ट खमंग ढोकळा खास तुमच्यासाठी

 

रेसिपी – 

 

कॅल्शियम युक्त हेल्दी लाडू बनवण्याचे साहित्य –

१ . अर्धा कप बिया नसलेले खजूर

२. अर्धा कप तीळ

३. अर्धा कप शेंगदाणे

४. पाव टीस्पून वेलची पावडर.

कॅल्शिम युक्त हेल्दी लाडू बनवण्याची कृती –

१ . सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तीळ भाजून घेणे.

२. तीळ भाजून घेतल्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून भाजून घेणे . थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून घ्या. त्याचा कूट तयार करून घ्या.

३. थोडंस तूप घालून खजूर मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि त्याच्या पेस्टमध्ये बाकीचे सगळे पदार्थ घाला.

४. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि हाताला थोडे तूप लावून लाडू वळून घ्या.

हे ही वाचा:

जाणून घ्या… ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version