Holi 2023, पुरणपोळी सोबत तुम्ही सुद्धा कटाची आमटी नक्की करून पहा

होळीचा सण (Holi festival) म्हंटल की वेगवेगळे पारंपारिक पदार्थ घरोघरी बनवले जातात. होळीच्या या रंगांच्या उत्सवामध्ये घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात

Holi 2023, पुरणपोळी सोबत तुम्ही सुद्धा कटाची आमटी नक्की करून पहा

होळीचा सण (Holi festival) म्हंटल की वेगवेगळे पारंपारिक पदार्थ घरोघरी बनवले जातात. होळीच्या या रंगांच्या उत्सवामध्ये घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि होळीच्या या उत्सवाला पुरणपोळीचा तर मान असतोच पण त्या पुरणपोळीसोबत जर कटाची आमटी असेल तर पुरणपोळी खाण्याची मज्जा काही वेळीच असते. होळीच्या सणाला बनवलेले पदार्थ फक्त दिसायला चांगले नसतात तर खाण्यासाठी अतिशय चवदार देखील असतात. होळीच्या या सणाच्या निमित्ताने खास कटाची आमटी हा पारंपारिक पदार्थ कसा तयार करायचा याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कटाची आमटी बनवण्याचे साहित्य –

कटाची आमटी बनवण्याची कृती –

अनेक वेळा पुरणपोळी सोबत कटाची आमटी सुद्धा केली जाते त्यामुळे पुरणपोळी करताना जेव्हा चणाडाळ शिजवली जाते तेव्हा त्या चणाडाळीमध्ये थोडे जास्त पाणी घालून ती डाळ शिजवली जाते. जेव्हा आपण पुरणासाठी डाळ शिजवायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये एक कप जास्त पाणी घालावे आणि दीड कप शिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवावी किंवा नेहमीप्रमाणे चणाडाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घेतली तरी चालेल.

कटाची आमटी बनवण्यासाठी खोबऱ्याचा कीस, जिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे घटक मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्यावे व नंतर ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावेत. शिजवलेली चणाडाळ आणि एक कप काढून ठेवलेले चणाडाळीचे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या.

त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करून मोहरी जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून त्या सर्व मिश्रणाला चांगली फोडणी द्या. आवश्यक असल्यास त्यामध्ये थोडे पाणी घालावेत. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले डाळ आणि एक कप काढून ठेवलेले चणाडाळीचे पाणी घालावेत आणि उकळी आल्यावर त्यामध्ये कुटलेला गोडा मसाला घालावा. गोडा मसाला घातल्यावर आमटीला उकळी आल्यावर मिश्रण ढवळून घ्यावे त्यानंतर चिंचेचा कोळ आणि त्यामध्ये गूळ घालावा. त्यानंतर चवीनुसार आमटीमध्ये मीठ घालावे वरून ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एक दोन मिनिटे आमटी मंद आचेवर उकळू घ्यावे. गरमागरम आमटी तुमची तयार आहे.

हे ही वाचा :

अब्दुल सत्तरांच्या मतदार संघात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ज्यांनी मला वाढवला त्यांच्याशी पाईक राहणं माझा कर्तव्य आहे – संजय जाधव

मोठी बातमी! Amitabh Bachchan यांचा अपघात, तातडीने मुंबईत रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version