घरच्या घरी बनवा Testy Cake

केक हा सर्वांच्याच आवडीचा गोड पदार्थ आहे. हा एक पाश्चात्य पदार्थ असून अनेक देशांमध्ये हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक खायला फार आवडते. तसेच कोणताही सोहळा असला किंवा आनंदाचा प्रसंग असला की केक हा कापलाच जातो.

घरच्या घरी बनवा Testy Cake

केक हा सर्वांच्याच आवडीचा गोड पदार्थ आहे. हा एक पाश्चात्य पदार्थ असून अनेक देशांमध्ये हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक खायला फार आवडते. तसेच कोणताही सोहळा असला किंवा आनंदाचा प्रसंग असला की केक हा कापलाच जातो. कोणाचा वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो केक हा असतोच. केक हा गोड खाद्यपदार्थ तुम्ही आता घरातही बनवून खाऊ शकता तसेच तुमच्या प्रियजनांनाही खाऊ घालू शकता. चला तर मग हाच केक घरात कसा बनवतात ते पाहुयात.

 

 

साहित्य:

२ कप चॉकलेट प्रिमिक्स
१ कप पाणी
२ टेबलस्पुन तेल /बटर
अर्धा किलो व्हिप क्रिम
व्हॅनिला इसेन्स
अर्धा किलोचा केक टिन
बटरपेपर

कृती –

एका मिक्सिंग बाऊलमध्ये २ कप चॉकलेट प्रिमिक्स घ्या. त्यात १ कप पाणी घालून पातळ मिश्रण करून घ्या. मिश्रण खूप पातळ आणि घट्ट होणार नाही याची दक्षता घ्या. तसेच मिश्रणात २ टेबलस्पून कोणतेही खाद्य तेल घाला तसेच पाण्याचे प्रमाण काळजीपूर्वक ठेवा.त्यानंतर मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. नंतर पाव चमचा व्हॅनिला इसेंन्स घाला.असे करताना ते एकाच दिशेने ढवळा.

केक टीनला बटर ग्रीस करून त्यावर कॅकेचे मिश्रण चांगले स्प्रेड करून केक टिन सेट करून घ्या. केकचे मिश्रण त्यात ओता आणि डबा टॅप करून घ्या. त्यातील हवा बाहेर पडेल. ओव्हन असेल तर बेक करून घ्या अथवा एका मोठ्या टोपाच्या तळाशी स्टॅन्ड ठेवून त्याच्यावर केक टिन ठेवा आणि किमान ३५ मिनिटे झाकण ठेवून बेक करून घ्या. नंतर हे भांडे बाहेर काढून थंड करून घ्या.

त्यानंतर हे भांडे एका प्लेटवर उपडे करा. तुमचा केक सहजतेने बाहेर येईल.आता या केकला तुम्ही व्हिंप्ट क्रीमने सजवू शकता. तसेच त्याला व्हिंप्ट क्रीम न लावताही खाऊ शकता.हा केक तुम्ही फ्रिजमध्येही स्टोर करून ठेवू शकता.

 

हे ही वाचा:

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version