घरचा घरी बनवा कोथिंबीर पंजिरी; वाचा संपूर्ण रेसिपी

आपल्या दैंनदिन जेवणात कोथिंबिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जेवणाला चव येण्यासाठी आपण कोथिंबिरीचा वापर करतो.

घरचा घरी बनवा कोथिंबीर पंजिरी; वाचा संपूर्ण रेसिपी

आपल्या दैंनदिन जेवणात कोथिंबिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जेवणाला चव येण्यासाठी आपण कोथिंबिरीचा वापर करतो. जेवणात कोथिंबिरीचा वापर केल्याने जेवण अधिकच चविष्ट बनते. त्याचबरोबर कोथिंबीर पासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात. कोथिंबीर वडी तर अनेकांची आवडती असते. कोथिंबीरीचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. आपल्या रोजच्या जेवणातून कोथिंबीरीचे सेवन आवश्यक करावे. कोथिंबीरीचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मुधुमेह असलेल्यांची कोथिंबीरचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोथिंबीरीचे अनेक फायदे आहेत. असाच एक कोथिंबिर पासून बनवलेला पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पदार्थाचे नाव कोथिंबीर पंजिरी असे आहे. कोथिंबीर पंजिरी ही एक स्वीट डिश (Sweet Dish) आहे. कोथिंबीर पंजिरी हा पदार्थ अनेकदा धार्मिक विधींमध्ये देवदेवतांना प्रसाद म्हणून बनवला जातो. हा प्रसाद म्हणून बनवला जाणारा पदार्थ अत्यंत पौष्टीक आहे. भारतात खास करून उत्तर भारतात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवला जातो. चला तर मग जाणून घेऊया या पौष्टिक त्याचबरोबर चविष्ट पदार्थाची रेसिपी

कोथिंबीर पंजिरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

कोथिंबीर पेस्ट १.३ कप
कमळाच्या बिया १.२ कप
चिराउंजी १ चमचा
हिरवी वेलची १ चमचा
पिठी साखर ३ चमचे
काजू ३ चमचे
नारळ पावडर १.२ कप
तूप ३ चमचे

कोथिंबीर पंजिरी बनविण्यासाठीची कृती

कोथिंबीर पंजिरी बनविण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे असलेली कढई घ्या. कढई गॅसवर ठेवून गॅस पेटवा आणि त्या कढईमधे तूप घेऊन हलका लालसर- सोनेरी रंग येईपर्यंत मखाना व्यवस्थित भाजून घ्या. चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये खोबऱ्याची पावडर घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगल्यापराकारे ढवळत रहा. त्यानंतर त्या पॅनमध्ये काजू, बदाम, चारोळी, व्यवस्थित भाजून घ्या. सर्व साहित्य मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर दोन चमचे तूप घेऊन त्यात धणे पावडर घालून मंद आचेवर व्यवस्थित परतवून घ्या. नंतर मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्याच भांड्यात भाजलेली मेथी पावडर आणि सोबत खोबऱ्याची पावडर घेऊन त्यामध्ये पिठीसाखर टाका. आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. पिठीसाखरेनंतर त्यात काजू टाका आणि वेलची पूड आणि मखाना घालून सर्व साहित्य व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्या. त्यानंतर ही तयार झालेली कोथिंबीर पंजिरी एका भांड्यात काढून घ्या. भांड्यात काढून घेतल्यावर थंड करत ठेवा.

हे ही वाचा:

Sri Lanka विरुद्ध Pakistan कसोटी सामन्यामध्ये मिळाले २१ वर्षीय खेळाडूला स्थान

तुमचे आवडते Celebrity कसे अडकले विवाहबंधनात? | Your favorite celebrity |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version