spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी फ्रेंच टोस्ट बनविण्याची रेसिपी

फ्रेंच टोस्ट मध्ये शक्यतो अंडी वापरली जातात. पण आज आम्ही तुम्हाला अंड्याशिवाय (Eggless) फ्रेंच टोस्ट घरच्या घरी कसे बनवायचे ते सांगणार आहोत. नाश्त्यासाठी मुलांना रोज वेगवेगळे पदार्थ लागतात. आणि रोज कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न आईला पडतो. नाश्त्यासाठी पटकन आणि झटपट तयार होणारी रेसिपी खास तुमच्यासाठी फ्रेंच टोस्ट. फ्रेंच टोस्ट मुलांना देखील नाश्त्यासाठी खायाला खूप आवडतात. फ्रेंच टोस्ट बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर चला मग जाणून घेऊया फ्रेंच टोस्ट बनवण्याची रेसिपी.

हे ही वाचा : लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

 

फ्रेंच टोस्ट बनवण्याची रेसिपी –

 

फ्रेंच टोस्ट बनवण्याचे साहित्य –

ब्रेडचे ४ तुकडे

ताजी मलाई कपभर

कस्टर्ड पावडर १ टीस्पून

दालचिनी पावडर १ चिमूटभर

दूध अर्धा कप

चूर्ण साखर २ टेस्पून

लोणी १ टेस्पून

 

फ्रेंच टोस्ट बनवण्याची कृती –

सर्व प्रथम एक भांड्यात क्रीम, कस्टर्ड पावडर आणि पिठीसाखर घालून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये दूध आणि दालचिनी घालून चांगले ढवळून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये बटर गरम करून घ्या. मग ब्रेडचे तुकडे कस्टर्ड पिठात बुडवून पॅनमध्ये दोन्ही बाजूंनी चांगले बेक करा. ताज्या कापलेल्या फळांसह सर्व्ह करा.

हे ही वाचा :

कडू कारल्यापासून बनवा स्वादिष्ट सीख कबाब; जाणून घ्या रेसिपी

 

Latest Posts

Don't Miss