spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरी बनवा हटके स्वीट कॉर्न पराठा

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळयात सर्वात अधिक येणाऱ्या पदार्थांमध्ये स्वीट कॉर्नचा समावेश येतो. कॉर्न हे एक चांगले प्रोबायोटिक आहे कारण ते आपल्या शरीरात फायदेशीर आतड्यांतील बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करते.

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळयात सर्वात अधिक येणाऱ्या पदार्थांमध्ये स्वीट कॉर्नचा समावेश येतो. कॉर्न हे एक चांगले प्रोबायोटिक आहे कारण ते आपल्या शरीरात फायदेशीर आतड्यांतील बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करते. यामुळे तुमची पचनक्रियाही चांगली होते आणि तुमची चयापचय क्रियाही वाढते. जे तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. याच कॉर्न पासून आज आपण पराठा तयार करणार आहोत. तुम्ही अनेकदा स्वीट कॉर्न उकडून किंवा भाजून खाल्ले असतील,पण तुम्ही याचा कधी पराठा बनवला आहे का ? स्वीट कॉर्नपासून बनवला जाणारा हा पदार्थ खायला फार रुचकर लागतो. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

गव्हाचे पीठ – १ कप (Wheat flour)
स्वीट कॉर्न – १ (Sweet Corn)
हिरवी मिरची चिरलेली – १ टीस्पून (Chopped green chillies )
हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे (Chopped Green Coriander)
ओवा – १/४ टीस्पून (Ova)
मीठ – चवीनुसार (Salt)

कृती:

स्वीट कॉर्न पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम कॉर्न घ्या आणि किसून घ्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात पीठ टाका आणि त्यात स्वीट कॉर्न पल्प टाका आणि दोन्ही नीट एकजीव करा. यानंतर हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि वाटीत टाकून मिक्स करा. नंतर चवीनुसार ओवा आणि मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. लक्षात ठेवा की पीठ थोडे कडक मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर १५-२० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे, पीठ सेट होईल. पीठ तयार झाल्यावर थोडे तेल लावून पुन्हा मळून त्याचे गोळे बनवा. आता एक गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घ्या. आता गॅसवर नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल पसरवा. आता लाटलेला पराठा तव्यावर ठेवा आणि काही मिनिटे शिजू द्या. यानंतर पराठ्याच्या कडांना थोडे तेल लावून पराठा उलटा. यानंतर, पराठ्याच्या वरच्या भागाला तेल लावा आणि पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये पराठा काढा. त्याचप्रमाणे सर्व पराठे तयार करा. नाश्त्यासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी कॉर्न पराठा तयार आहे. हे पराठे तुम्ही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

पैसे न देता कॅबने प्रवास करत महिलेची Cab Driver वर दमदाटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss