spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी कसे बनवायचा रेड सॉस पास्ता

पास्ता खायाला सर्वांना आवडतो. तसेच पास्ता हा वेगवेगळया पद्धतीने देखील बनवता येतो. मुलांना सकाळच्या नाश्त्यामध्ये पास्ता, मॅगी असे पदार्थ बनवून दिल्यास मुले आवडीने खातात. त्यांना पास्ता, मॅगी खायाला खूप आवडतात. रोज रोज तेच पदार्थ खाऊन मुलांना देखील कंटाळा येतो. त्यांना रोज काहीतरी वेगळा पदार्थ सेवन करायला आवडतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून रेड सॉस पास्ता कसा बनवायचा या बद्दल सांगणार आहोत.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज, इटालियन असे पदार्थ आपण ऑर्डर करत असतो. त्यामध्ये पिझ्झा, पास्ता हे पदार्थ आपल्याला खूप आवडतात. पिझ्झा आणि पास्ता रेसिपी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तिच रेसिपी आपण घरी देखील बनवू शकतो. काही जणांना व्हाईट सॉस पास्ता, चीझ पास्ता, असे अनेक पास्ता सेवन करायला आवडतात. पण हॉटेल सारखी पास्त्याची रेसिपी आपण घरी देखील बनवू शकतो हे काहीजणांना माहित नसते. तर आज आम्ही तुम्हाला हॉटेल सारखी पास्त्याची रेसिपी घरी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

 

रेड सॉस पास्ता बनवण्याचे साहित्य –

१ वाटी पेनी पास्ता
२ टॉमेटो
३-४ लाल मिरची
१ कांदा
१ चमचा लसूण बारीक चिरलेली
१ चमचा काळी मिरी पावडर
१ चमचा हब्स
२ चमचे तेल
चवीनुसार मीठ
१ चमचा चिलीफ्लेक्स

कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून घ्या.

त्यामध्ये टॉमेटो, लाल मिरची घालून घ्या आणि चांगले शिजवून घ्या. शिजल्यानंतर टोमॅटो थंड होऊन द्या. आणि थंड झाल्यानंतर त्याची साले काढून घ्या. आणि मिक्सकर मध्ये वाटून घ्या.

दुसऱ्या भांडयात पाणी गरम करून घ्या आणि त्यामध्ये पास्ता शिजवून घ्या.

पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये कांदा आणि लसूण घालून घ्या अंडी परतवून घ्या.

मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये पास्ता सॉस घालून शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात मीठ, काळी मिरी पूड आणि हब्स घालून परत एकदा शिजवून घ्या.

मिश्रण शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पास्ता घालून घ्या आणि परत एकदा मिक्स करून घ्या. आणि खाण्यासाठी पास्ता तयार आहे.

हे ही वाचा :

मूग डाळ आहारात असल्याचे फायदे, जाणून घ्या…

 

Latest Posts

Don't Miss