ख्रिसमसला स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार घरच्या घरी कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

दरवर्षी २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो.

ख्रिसमसला  स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार घरच्या घरी कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

दरवर्षी २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला. त्याच्या आईचे नाव मरीया आणि वडिलांचे नाव योसेफ होते. या दिवशी, ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्‍या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात आणि विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते.घरातील लहान मुलांची ख्रिसमसला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा असते. तर आज आपण ख्रिसमस स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:-

एक कप ओट्स
दोन कप खजूर
एक कप बदाम
दिड चिरलेले कप अक्रोडाचे तुकडे
दिड कप पीनट बटर किंवा बदाम बटर
फ्लेक्स बियाणे पावडर

कृती:-

पीनट बटर ग्रॅनोला बार बनवण्यासाठी सर्वप्रथम ओट्स एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घ्या. त्यानंतर ओट्स किंचित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या, नंतर ते थोडे थंड होऊ द्या. आता बदाम, अक्रोड आणि अंबाडीच्या बियांची पावडर तयार करुन घ्या. पावडर थोडी खरखरीत राहू द्या.आता फूड प्रोसेसरमध्ये खजूर ठेवा आणि तो बारीक करून घ्या. आता बदाम पावडर, अक्रोड पावडर, फ्लेक्स सीड पावडर, पीनट बटर, ओट्स घालून चांगले एकजीव करा.आता हे मिश्रण एका चौकोनी ताटात ठेवा आणि वरून दाबा टाका जेणेकरून ते वरून एकसारखे होईल. आता रेफ्रिजरेटरमध्ये ३ ते ४ तास तसेच ठेवून द्या.आता ते अर्धवट कापून एअर टाईट डब्यात ठेवा. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या कॉफीसोबत नो बेक पीनट बटर ग्रॅनोला बार खायला देऊ शकता.

हे ही वाचा:

केसांच्या विगमध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला अटक

कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र बिहारच्या मागे, जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version