Saturday, June 29, 2024

Latest Posts

पावसाळ्यात पालक वडी खायची मज्जा काही औरच; पण बनवायची कशी?

पालकांपासून अनेक पदार्थ बनवता येतात. पालक पनीर, पालक पराठा, पालक पुरी, पालक भजी इत्यादी पदार्थ बनवण्यात येतात. याच पालकपासून आज आपण कुरकुरीत, खमंग पालक भजी कशी बनवायची हे पाहूयात.

पालक ही अशी पालेभाजी आहे जी काही घरांमध्ये आवडीने खाल्ली जात नाही. पालक चवीला फारशी चविष्ट नसली तरी त्यात अनेक गुणकारी घटक आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पालकांपासून अनेक पदार्थ बनवता येतात. पालक पनीर, पालक पराठा, पालक पुरी, पालक भजी इत्यादी पदार्थ बनवण्यात येतात. याच पालकपासून आज आपण कुरकुरीत, खमंग पालक भजी कशी बनवायची हे पाहूयात.

पालक वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पालक – १ जुडी (बारीक चिरलेला)
  • बेसन – २ वाट्या
  • गव्हाचे पीठ – १ वाटी
  • जिरे – २ चमचे
  • तीळ – २ चमचे
  • हिरवी मिरची – ४ ते ५
  • लसूण – ६ ते ७ पाकळ्या
  • हळद – १/४ चमचा
  • लिंबू – १
  • मीठ चवीनुसार
  • गरजेनुसार पाणी
  • तेल तळण्यासाठी

कृती:

  • प्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे टाकून बारीक पेस्ट करून घ्या.
  • एका भांड्यात बारीक केलेला पालक, बेसनचे पीठ, गव्हाचे पीठ, तीळ, हळद, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि तयार केलेली पेस्ट टाकून एकत्र करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात गरज असल्यास थोडे थोडे पाणी घालून हाताने घट्टसर मळून घ्या.
  • तयात केलेल्या पिठाचा हाताच्या साहाय्याने लांबसर रोल करून घ्या.
  • एकीकडे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा दुसरीकडे एका चाळणीत तयार केलेले पालकचे रोल ठेवा आणि  चाळणीवर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
  • पालक वड्या थंड झाल्या की सुरीने गोलाकार कापून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात कापलेल्या वड्या मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • खुसखुशीत आणि खमंग पालकच्या वड्या जेवणासोबत तोंडी लावायला किंवा सॉससोबत खाऊ शकता.

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss