कशी तयार करायची केळीची कचोरी ? जाणून घ्या रेसिपी…

कशी तयार करायची केळीची कचोरी ? जाणून घ्या रेसिपी…

केळी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही जणांना केळी खाणे आवडत नाही. पण केळी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच आता परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे आपल्याला चमचमीत खाण्याचे पदार्थ खायाला खूप आवडते. आपण कचोरी, समोसे , असे पदार्थ खायाला कंटाळतो. आपल्याला नवीन नवीन पदार्थ खायाला खूप आवडते. तर आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल केळ्यांची कचोरी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : घरच्या घरी बनवा शेवयांची चविष्ठ खीर

 

साहित्य –

चार मोठी कच्ची केळी

तिन चमचे तांदळाचे पीठ

चवीनुसार मीठ

एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट

चार चमचे शेंगदाण्याचा कुट

एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट

एक कप ताजे खोबरे (किसलेले)

कढीपत्ता (बारीक चिरून)

दोन चमचे पांढरे तीळ (भाजलेले)

चवीनुसार मीठ

दोन चमचे साखर

जिरे

एक चमचा लिंबाचा रस

दोन चमचे कोथिंबीर

तेल

दही डिप तयार करण्यासाठी

१०० ग्रॅम दही

चवीनुसार मीठ

दोन चमचे साखर

 

कृती –

कचोरी बनवण्यासाठी केळी उकळा आणि मॅश करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मॅश केलेली केळी घ्या. आणि त्यात तांदळाचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ आणि एक छोटा चमचा तेल एकत्र करून मिश्रण बाजूला ठेवणे. कचोरीचे स्टफिंग तयार करण्यासाठी एका भांड्यात किसलेले खोबरे, हिरव्या मिरचीची पेस्ट, भाजलेले आणि बारीक केलेले शेंगदाणे, भाजलेले पांढरे तीळ, जिरे, कढीपत्ता, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा. आणि तुमचे स्टफिंग तयार आहे.

त्यानंतर कच्च्या केळ्याचे मिश्रण घेऊन त्याचे गोळे बनवा. हाताला तेल लावून घ्या आणि गोल आकारात थापून घ्या. त्याला मध्यभागी ठेवा. तो गोल गोळा बंद करून घ्या आणि वरून तांदळाचे पीठ लावून घ्या मग तेलात तळून घ्या. तळून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केले स्टफिंग घाला आणि दही सोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा :

चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी

 

Exit mobile version