साऊथ इंडियन फूडचे चाहते असाल तर घरच्या घरी बनवा हा पदार्थ

साऊथ इंडियन फूडचे चाहते असाल तर घरच्या घरी बनवा हा पदार्थ

मेदू वडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे. तसेच ही डिश लोक आवडीने खातात. मेदू वडा ही डिश खायाला खूप चविष्ट आणि पौष्टिक असते. तसेच दक्षिण भारतातून बाहेर पडलेले पदार्थ भारतीय घरामध्ये खूप पसंत केले जातात. तसेच इडली डोसा हे देखील पदार्थ भारतात खूप प्रसिद्द आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला नवीन पदार्थ काय बनवायचा असेल तर तुम्ही मेदू वडा ही डिश नक्की बनवून बघा. तर आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडिया स्पेसिअल डिश मेदू वडा घरच्या घरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. तर ही बातमी नक्की वाचा.

हे ही वाचा : उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

 

मेदू वडा बनवण्याचे साहित्य –

एक वाटी उडद डाळ

एक बारीक चिरलेला कांदा

जिरे

काळीमिरी

कडीपत्ता

हिरव्या मिरच्या

हिंग

कोथिंबीर

तेल

चवीनुसार मीठ

 

मेदू वडा बनवण्याची कृती –

सर्व प्रथम उडीद डाळ पाण्यात २-३ तास भिजत ठेवा. त्यानंतर उडीद डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि चांगली फेटून घ्या. पीठ चांगले फेटून झाले की त्यामध्ये कांदा, कडीपत्ता , हिंग , कोथिंबीर , मीठ, मिरच्या ,जिरे ,काळीमिरी घालून घ्या. त्यानंतर तेल चांगले गरम करून घ्या. तेल गरम होईपर्यंत त्या मिश्रणाचे गोळे चपट आकारामध्ये थापून घ्या आणि त्याला मधे एक छिद्र पाडा आणि चांगले तपकिरी होईपर्यंत तेलात तळून घ्या. आणि सांबरसोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा :

संध्याकाळच्या चहा सोबत बनवा स्पेशल पालक चाट

 

Exit mobile version