नवरात्रीमध्ये जर तुमचा उपवास असेल तर घरच्या घरी बनवा भगरीचे धिरडे

लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्वाचे मानले जाते.

नवरात्रीमध्ये जर तुमचा उपवास असेल तर घरच्या घरी बनवा भगरीचे धिरडे

लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्वाचे मानले जाते. सगळेच नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत आहे. देवीच्या उत्सवात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. नवरात्री उत्सवात नऊ दिवस उपवास केला जातो. नवरात्रीमध्ये केलेला उपवास हा शुभ मानला जातो. नऊ दिवसाच्या उपवास कालावधीत शरीरात ऊर्जा असणं फार महत्वाचे आहे. उपवासाच्या वेळी आपण काहींना काही खात असतो. या उपवासाच्या दरम्यान आपण साबुदाणे, भगर, बटाट्याची भाजी हे सगळं खातो. पण जर तुम्हला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये भगरीचे धिरडे बनवू शकता. चला तर पाहूयात रेसिपी…

साहित्य:-
२ उकडलेले बटाटे
१ वाटी भगर
पाव वाटी साबुदाणा
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
४ ते ५ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
चवीनुसार मीठ

 कृती:-

सर्वप्रथम भगरीचे धिरडे बनवण्यासाठी भगर साफ करून घ्या. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या. भगर आणि साबुदाणा भिजवून ठेवा. त्यानंतर बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडून झाल्यानंतर ते थोडे थंड करून घ्या. थंड करून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या. नंतर ते बटाटे कुसकुर करून घ्या आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून व्यवस्थित पेस्ट करून घ्या. भिजवलेले साबुदाणे आणि भगर मिक्सर मधून वाटून घ्या. डोसा बनवण्यासाठी जसं पीठ लागतं, अगदी तितकं हे मिश्रण बारीक करुन घ्या. ते मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कुट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घ्या.नंतर कुस्करलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. गरजेप्रमाणे त्यात पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घ्या. बॅटर जास्त घट्टही असू नये किंवा जास्त पातळ देखील करू नये. नंतर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम करून त्यावर तेल टाकून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यावर ते मिश्रण टाकून पसरवून घ्या. त्यानंतर ते दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या. गरमागरम भगरीचे धिरडे ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार.

हे ही वाचा: 

समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा- शरद पवारांचे महिलांना आवाहन

चिन्मय उदगीरकरच्या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version